भुर्इंज : कोल्हापूरहून कर्नाटक बसने मुंबईला निघालेल्या एका खासगी कुरिअरच्या कर्मचाऱ्यांकडे तब्बल २१८ किलो चांदी आणि तीन लाख ६५ हजारांची रोकड सापडली. मात्र, त्या ऐवजाचे चलन आणि रीतसर पावत्या कर्मचाऱ्यांकडे आहेत. पुणे आणि मुंबई येथील दुकानदारांना देण्यासाठी हा ऐवज नेत असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्येही काही संशयास्पद सापडले नाही. भरारी पथक आणि आयकर विभाग त्यांच्याकडे चौकशी करीत आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
कुरिअरची २१८ किलो चांदी पकडली
By admin | Updated: October 2, 2014 23:54 IST