शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

चार गावांतच प्लास्टिक बंदीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:31 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्लास्टिक बंदीचा मोठा गाजावाजा करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील केवळ दोन तालुक्यांतील फक्त चार गावांमध्येच प्लास्टिक बंदीची कारवाई केली आहे. उर्वरित १० तालुक्यांमध्ये पंचायत समित्यांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. ३० जून २०१८ नंतर करवीर आणि शिरोळ या दोन तालुक्यांमधून १ लाख ५ हजार रुपयांचा ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्लास्टिक बंदीचा मोठा गाजावाजा करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील केवळ दोन तालुक्यांतील फक्त चार गावांमध्येच प्लास्टिक बंदीची कारवाई केली आहे. उर्वरित १० तालुक्यांमध्ये पंचायत समित्यांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. ३० जून २०१८ नंतर करवीर आणि शिरोळ या दोन तालुक्यांमधून १ लाख ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.शासनाच्या पर्यावरण विभागाने २३ मार्च, ११ एप्रिल आणि २ जुलै रोजी जे आदेश दिले, मार्गदर्शक सूचना केल्या, त्यांनुसार जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने जिल्ह्यात सर्वत्र कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या. यासाठी जिल्हा स्तरावर, तालुकास्तरावर कार्यशाळाही घेण्यात आल्या होत्या. गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांनी याबाबतगावपातळीवर कारवाई करणे अपेक्षित होते.मात्र यातील केवळ करवीर आणि शिरोळ तालुक्यांतील गटविकास अधिकाºयांनी याबाबत पुढाकार घेत दंडाची कारवाई केली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. करवीर आणि शिरोळ या दोन तालुक्यांमध्ये २१ जणांवर कारवाई करीत १ लाख ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. वळिवडे, गडमुडशिंगी, उचगाव, नृसिंहवाडी या चार गावांतच ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अधिकाधिक कापड दुकानांचा समावेश आहे.एकीकडे प्लास्टिक बंदीचा मोठा गाजावाजा केला गेला असताना केवळ चारच गावांमध्ये कारवाई करून जिल्हा परिषदेने मूळ हेतूलाच हरताळ फासल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.पुणे विभागात सर्वाधिक दंड वसुलीकोल्हापूर जिल्ह्यात १ लाख ५ हजार ही जी प्लास्टिक बंदीनंतरची वसुली झाली आहे, ती पुणे विभागात सर्वाधिक दंडवसुली असल्याचे सांगण्यात आले. याचाच अर्थ उर्वरित जिल्ह्यांमध्ये इतकीही दंडवसुली झालेली नाही.१३00 किलो प्लास्टिक पिशव्यांचे संकलनजिल्ह्यातील १0२७ ग्रामपंचायतींपैकी ८८६ गावांमध्ये एकूण १३00 किलो प्लास्टिक पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. एकदम दंडाची कारवाई न करता बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यावर भर देण्यात आल्याचे सांगण्यात आले.बंदी नसलेले घटक२०० मिलिलिटरपेक्षा द्रव धारण क्षमता असलेल्या बाटल्यानिर्यातीसाठी वापरले जाणारे प्लास्टिकउत्पादनांसाठी ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचे व २० टक्के पुनर्चक्रित प्लास्टिकपासून बनविलेले प्लास्टिकअन्नधान्य आणि किराणा माल सीलबंद प्लास्टिक पॅकेजिंग. जे ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाड आणि दोन ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे असेल.वन, फलोत्पादन, कृषी, घनकचºयासाठी लागणारी कंपोस्टेबल प्लास्टिक पिशवीप्लास्टिकचा एक थर असलेली खोकीदुधासाठीच्या पिशव्या, घरगुती वापराची प्लास्टिक उत्पादनेबंदी असलेले घटक२०० मिलिलिटरपेक्षा कमी द्रव धारण क्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्यासर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्याथर्माकोल व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाºया व एकदाच वापरल्या जाणाºया डिस्पोजेबल ताट, कप, प्लेट, ग्लास, काटे, वाटी, चमचे, बाउलहॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे कंटेनर, स्ट्रॉप्लास्टिक व थर्माकोलचा वापर, सजावटीसाठीचे साहित्य