प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदान नोंदणी करण्यात आली होती लगेच सकाळी अकरा वाजता विशेष सभा घेऊन विषयपत्रिकेचे वाचन करण्यात आले. मतदार नोंदणी झाल्यानंतर एकूण ७२९ नोंदणीकृत मतदान झाले. त्यापैकी एकूण ७१७ मतदान झाले. यावेळी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने ३४४ तर अविश्वास ठरावाच्या विरोधात ३७३ मते प्राप्त झाले. २९ मतांनी अविश्वास ठराव बारगळला आहे. लोकनियुक्त सरपंच दत्तात्रय कांबळे यांना २९ मते मिळून सरपंचपद पुन्हा एकदा विराजमान झाल्याने गावात कार्यकत्यांनी गुलाल व आतषबाजी करण्यात आली ग्रामपंचायतीमध्ये एकूण सात सदस्यसंख्या असून सदस्यांनीच सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र, मतदारांनी सरपंच कांबळे यांना मतपेटीद्वारे २९ मते प्राप्त झाल्याने विजयी झाले.
हिरवडे दुमालाच्या सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST