शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

करवीरमध्ये राष्ट्रवादीवर ‘नजरा’

By admin | Updated: October 2, 2014 00:37 IST

चुरशीची तिरंगी लढत : बदललेल्या समीकरणामुळे प्रस्थापितांचा कस लागणार

राजाराम लोंढे--कोल्हापूर-करवीर विधानसभा मतदारसंघात माघारीनंतर पंचरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पंचरंगी लढत होत असली तरी खरी लढत तिरंगीच होणार आहे. बदललेल्या समीकरणामुळे येथे प्रस्थापितांचा कस लागणार असून, ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसवर शेवटपर्यंत सर्वांच्या नजरा लागणार, हे निश्चित आहे. शिवसेनेकडून चंद्रदीप नरके, कॉँग्रेसकडून पी. एन. पाटील, जनसुराज्य-शेकापकडून राजेंद्र सूर्यवंशी, भाजपकडून केरबा चौगुले, तर ‘मनसे’कडून अमित पाटील, बहुजन पक्षाकडून भगवान कांबळे यांच्यासह दोन अपक्ष रिंगणात आहेत. गेले दीड -पावणेदोन महिने पाटील, नरके, सूर्यवंशी यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. या उमेदवारांच्या आतापर्यंत प्रचाराच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या आहेत. केरबा चौगुले व अमित पाटील यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने त्यांनी आता प्रचारास सुरुवात केली आहे. गेल्या वेळेला अशीच तिरंगी लढत झाली होती; पण समीकरणे वेगळी होती. ‘जनसुराज्य’ने कॉँग्रेसला पाठिंबा दिला होता; तर भाजप सेनेबरोबर होती. आता उलटी स्थिती आहे. ‘जनसुराज्य’ने ‘शेकाप’च्या मदतीने आपला उमेदवार उभा केला असून, भाजपने सवता सुभा केल्याने येथे काटा लढत पाहावयास मिळणार आहे. आघाडीतील बिघाडीनंतर राष्ट्रवादीने येथे ताकदीचा उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला; पण ‘भोगावती’ व ‘राधानगरी’तील राजकारणामुळे ऐन वेळी निर्णय बदलल्याने समीकरणे पुन्हा बदलली आहेत. राष्ट्रवादीने जनसुराज्यला पाठिंबा जाहीर केल्याने राजेंद्र सूर्यवंशी यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीची निर्णायक ताकद आहे. यासाठी ‘भोगावती’चे सात संचालक येतात. तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे, जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांचा गटही कार्यरत आहे. राष्ट्रवादी सूर्यवंंशी यांच्यामागे ताकदीने उभी राहिली तर येथे नरके, पाटील व सूर्यवंशी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहावयास मिळू शकतो; पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मानसिकता, भोगावतीचे राजकारण पाहता, राष्ट्रवादी सूर्यवंशी यांच्यामागे एकसंधपणे राहील, अशी सध्याची तरी परिस्थिती नाही. परिस्थितीचा अंदाज घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंतिम क्षणी ‘शिवधनुष्य’ हातात घेतला तर आश्चर्यही वाटायला नको. राधानगरी तालुक्यात एकास एक लढतीसाठी झालेले प्रयत्न पाहता, येथे पी. एन. पाटील यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी शर्थीचे प्रयत्न करणार, हे निश्चित आहे. राष्ट्रवादीने आपली भूमिका जाहीर केली असली तरी शेवटपर्यंत सर्वच पक्षांच्या राष्ट्रवादीवर ‘नजरा’ राहणार आहेत. दरम्यान, लोकसभेत धनंजय महाडिक यांना पी. एन. पाटील यांनी मदत केली होती. त्याचे फळही महाडिक यांना मिळाले; पण आता समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादीने जनसुराज्यला पाठिंबा दिल्याने महाडिक यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यांचे समर्थक सध्या द्विधा मन:स्थितीत दिसत आहेत. करवीरएकूण मतदार २,८७,४८0नावपक्षचंद्रदीप नरके शिवसेनापी. एन. पाटीलकाँग्रेसकेरबा चौगुले भाजपराजेंद्र सूर्यवंशी जनसुराज्य शक्तीअमित पाटीलमनसेभगवान कांबळे बसपाअरविंद माने अपक्षकिशोर भाटे अपक्ष