शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत राजकीय सूडनाट्य रंगल

By admin | Updated: February 27, 2015 23:17 IST

विशेष सभा : महापौरांवर बहिष्काराचा आदेश धुडकावून कॉँग्रेसचे महाडिक समर्थक नगरसेवकांची उपस्थिती; सभेची औपचारिकता पूर्णे

कोल्हापूर : महापौर राजीनामा प्रकरणाचे राजकीय पदर आता खुले होत असून सत्ताधारी कॉँग्रेसमधील महाडिक समर्थक नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या विशेष सभेस उपस्थिती लावल्याने महापालिकेचे राजकारण ढवळून निघाले. सभेला उपस्थित सहापैकी तब्बल चार नगरसेवक कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नगरसेवकांनी या सभेकडे पाठ फिरवली.नगरसेवक सुनील कदम यांनी विधानसभा निवडणुकीचा मद्दा उचलत थेट कॉँग्रेस नेत्यांवर हल्ला चढवत घरचा आहेर दिला आहे.राज्य शासनाच्या सूचनेनुसार बुधवारी कोरमअभावी तहकूब झालेली ‘विशेष सभा’ आज पुन्हा झाली. १२ वाजून २५ मिनिटांनी सभेला सुरुवात झाली. सभागृहात कॉँग्रेसचे किरण शिराळे, सत्यजित कदम, राजू घोरपडे, राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिलेल्या अपक्ष माधुरी नकाते, शिवसेना आघाडीचे अपक्ष महेश कदम व भाजपचे आर. डी. पाटील हे नगरसेवक उपस्थित राहिले. भाजपच्या प्रभा टिपुगडे सभागृहात उपस्थिती दर्शवून खासगी कामानिमित्त लगेच निघून गेल्या. सभेसाठी आवश्यक २८ नगरसेवकांची उपस्थिती नसल्याने कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली. ही तहकूब सभा पुन्हा १२ वाजून ४५मिनिटांनी पुन्हा घेण्यात आली. महापालिका कायदा कलम १/क नुसार कोरमची गरज नसल्याने सभेची औपचारिकता पूर्ण झाली. सुरुवातीस उपायुक्त विजय खोराटे यांनी सभागृहास सर्वेक्षणाची माहिती दिली. विशेष सभा फक्त सर्वेक्षणाची माहिती देण्यासाठी बोलावली असल्याने आर. डी. पाटील यांची प्रश्नोत्तरे घेण्याची मागणी प्रशासनाने अमान्य केली. यानंतर सभा तहकूब करण्यात आली. सभेची औपचारिकता संपली तरी दिवसभर कवित्व सुरू होते. कॉँग्रेसचे तीन नगरसेवक तर राष्ट्रवादी पुरस्कृत एका नगरसेविकेने बहिष्काराचे आवाहन करूनही उपस्थिती दर्शविल्याने सत्ताधारी नगरसेवकांत चिंतेची लकेर उमटली. उपस्थित नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे गटनेत्यांनी स्पष्ट केले.महाडिक समर्थक कॉँग्रेसचे किरण शिराळे व राजू घोरपडे हे दोघे सभा सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनिटे सभागृहात उपस्थित होते; तर सत्यजित कदम पहिली सभा संपल्यानंतर सभागृहात आले. आमदार महादेवराव महाडिक यांनी उपस्थित राहण्याबाबत परवानगी दिल्यानेच कदम यांनी हजेरी लावल्याची नगरसेवकांत चर्चा होती. माळवींचे ‘पद रद्द’ चा प्रस्ताव पाठवा महापौर तृप्ती माळवी यांच्यावर लाचखोरीचा संशय आहे. पदाचा गैरवापर व अशोभनीय वर्तन केल्याबद्दल महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ कलम (१)(अ) नुसार राज्य शासनाकडे महपौरांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवा, या मागणीचे आयुक्त पी. शिवशंकर यांना तब्बल ६० नगरसेवकांच्या सह्याचे निवेदन कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे गटनेते शारंगधर देशमुख व राजेश लाटकर यांनी दिले. विधितज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य तो अहवाल राज्य शासनास पाठविण्यात येईल, असे आयुक्तांनी नगरसेवकांच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले. लाचखोरीच्या संशयात अडकल्यानंतर महापौर तृप्ती माळवी यांनी नैतिकता दाखवीत पदावरून दूर होणे गरजेचे होते. त्यामुळे नगरसेवकांनी महापौरांच्या जाहीर व प्रशासकीय कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. शिवसेनेची अनुपस्थितीमहापौर माळवी यांच्या राजीनाम्यावरून आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. मात्र, आजच्या सभेकडे ‘लग्नसराई’ची घाई असल्याच्या कारणास्तव शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाठ फिरविली. शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात अनुपस्थितीत राहावे, यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक अनुपस्थित राहिले, अशी चर्चा आहे.सभागृहात उपस्थित राहणारच : सत्यजित कदमकाँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत कसबा बावड्यासह शहरात दुहेरी भूमिका घेतली. त्यावेळी पक्षनिष्ठा कुठे गेली होती, असा सवाल उपस्थित करत नगरसेवक सत्यजित कदम यांनी मनपाच्या सर्व सभांना उपस्थित राहणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. कदम यांचा ‘घरचा आहेर’ मिळाल्याने सत्ताधारी आघाडीत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. महापौर तृप्ती माळवी यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीने बहिष्काराचे धोरण स्वीकारले आहे तरीही सभागृहात काँग्रेसचे नगरसेवक उपस्थिती दर्शवत आहेत. विधानसभा निवडणुकीत अधिकृत काँग्रेसचा उमेदवार असतानाही माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवारास मदत केली. त्यावेळी नेत्यांची पक्षनिष्ठा कुठे गेली होती. विद्यमान आमदार शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.