शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

संस्कार घडविणारे मडिलगेचे शंकरलिंग विद्यामंदिर

By admin | Updated: June 30, 2015 00:18 IST

शिष्यवृती परीक्षेत यश मिळविणारी अशी ख्याती व तशी प्रतिमा टिकविणारी ही शाळा पाचवी गणित प्रावीण्य परीक्षेत सात व गणित प्रज्ञाशोध परीक्षेत पात्र एक विद्यार्थी असे यश मिळविणारी

मडिलगे (ता. आजरा) येथील शंकरलिंग विद्यामंदिर ही जिल्हा परिषदेची शाळा आहे, पण शाळेत शिस्त, स्वच्छता आणि खासगी शाळेपेक्षाही भौतिक सुविधा खूप आहेत. येथील पटसंख्या २९४ इतकी असून ११ शिक्षक आहेत. बाग इतकी छान आहे की, बोलक्या व्हरांड्यातील विद्यार्थिनी संचलित परिपाठ ऐकून भारावून जायला होते. पर्यावरणाचा संदेश रुजविण्यात व कृतिजन्य अनुभव देण्यातून शिक्षकांनी भरपूर उपक्रम राबविले आहेत. श्रमप्रतिष्ठा मूल्य रुजविण्याचाही प्रयत्न होत आहे. शिक्षक उपक्रमशील असून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून राबत आहेत. ते शाळेत सकाळपासून ते अगदी अंधार पडेपर्यंत मग्न झालेले दिसतात. या सर्व सातत्यपूर्ण व नियोजन प्रयत्नांमध्ये शालेय पटनोंदणी १०० टक्के व गळती शून्य टक्के आहे.शाळेची इमारत भव्य असून १५ खोल्या आहेत. त्याचबरोबर दोन पाण्याच्या टाक्या व मुलांसाठी शौचालय, एक कमोड व आठ मुतारी आणि मुलींसाठी शौचालय व सात मुताऱ्या आहेत. शाळेचे क्षेत्रफळ दोन हजार चौरस फुटांपेक्षा जास्त असून दोन लोखंडी गेट व संरक्षक दगडी भिंत आहे. यामध्ये फुललेली बाग नयनरम्य व कल्पकता ही परिश्रमाचा पुरावा देणारी आहे. स्वागताला सरस्वतीची संगमरवरी मूर्ती आहे. खूप प्रसन्न व विद्येच्या मंदिराचा येथे खऱ्याअर्थाने अनुभव येतो. ही शाळा स्पर्धा परीक्षांसाठी अगदी ख्यातनाम आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचा आलेख उंचावलेला आहे. आजपर्यंत चौथी पूर्व माध्यमिक शिष्यवृतीधारक विद्यार्थी ९८ टक्केइतके व २०१४-१५ मध्ये चार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले. इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्तीधारकांची संख्या ११८ इतकी व २०१४-१५ मध्ये पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीप्राप्त आहेत. शंकरलिंग विद्यामंदिर म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना गोडी निर्माण करणारे व स्पर्धेसाठी आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे तंत्र रुजविणारी गुणवत्तापूर्ण शाळा होय. खासगी शाळांनासुद्धा मागे टाकणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील यश हे विद्यार्थिकेंद्रित शिक्षणाचा ठोस व वास्तव पुरावाच आहे.शिष्यवृती परीक्षेत यश मिळविणारी अशी ख्याती व तशी प्रतिमा टिकविणारी ही शाळा पाचवी गणित प्रावीण्य परीक्षेत सात व गणित प्रज्ञाशोध परीक्षेत पात्र एक विद्यार्थी असे यश मिळविणारी आहे. प्रश्नमंजूषा स्पर्धेत या शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्रात प्रथम तसेच तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला असून जिल्हास्तरावर चौथा क्रमांक मिळविला. मोठा गटसुद्धा प्रश्नमंजूषा स्पर्धेत मागे नाही. केंद्रस्तर प्रथम, तालुकास्तर प्रथम व जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक या शाळेने मिळविला आहे. जादा तास, सराव, चाचणी आणि स्पर्धेची भीती काढून टाकून आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणारे शिक्षक खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत. गुणवत्ता विकासात सातत्याने यश राखले आहे. राजर्षी शाहू सर्वांगीण विकास अभियानात २००३-०४ मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक व राज्य सरकारचा विशेष पुरस्कारही मिळविला आहे. शैक्षणिक गुणवत्ता अभियानात प्रथम व नंतर द्वितीय क्रमांक मिळविला आहे. स्वच्छ, सुंदर शाळा स्पर्धेतही शाळा प्रथम आली आहे. शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात आजपर्यंत ‘अ’ श्रेणी मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक याच शाळेने मिळविला आहे. मूल्यमापनात ग्रामविकास मंत्रालयाच्या निकषानुसार जिल्ह्यात प्रथम येणारी हीच शाळा. माझी समृद्ध शाळा यामध्ये ‘अ’ श्रेणी मिळालेली आहे. आजऱ्यातील काहीशा दुर्गम, लाल माती, कच्चे रस्ते असलेल्या भागातील ही प्राथमिक शाळा म्हणजे गुणवत्तेची गंगा खेड्यापर्यंत पोहोचत आहे. शाळेची वैशिष्ट्येविद्यार्थ्यांसाठी ई- लर्निंग असून त्याचा वापर सुरू आहे. संगणकाचा वापर तर आहेच, पण पाचवी ते सातवीचे विद्यार्थी विशेष पारंगत आहेत.खो-खो व कबड्डीमध्ये केंद्र व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. ग्रंथालयात ८४० पुस्तके असून मुले ती वाचतात. वाचलेल्या पुस्तकांबद्दल मुले सांगतात. क्षेत्रभेटींच्या आयोजनातून विद्यार्थी अनुभव, ज्ञान व माहिती मिळवितात.विद्यार्थ्यांच्या संगणक, नेट वापरण्यातून त्यांचा सराव व पारंगतता लक्षात येते. सोनतळी येथे गाईडचे शिबिर घेण्यात आले. सहावी व सातवी विद्यार्थ्यांनी नगरपालिकेला भेट दिली. प्रशासनाचे काम समजून घेतले. मूकबधिर विद्यालयाला भेट दिली. तेथील शिक्षकांशी संवाद साधला. दूध डेअरीला भेट देऊन दूध संकलन, दर, फॅट, वितरण वगैरेची माहिती घेतली. अभ्यासिका, संगणक प्रशिक्षण, विषयकोपरे, चित्रसंग्रह, बालसभा हे सांस्कृतिक, तर हस्ताक्षर स्पर्धा, मनोरंजन कार्यक्रम नेटके व नियोजनपूर्वक असते. योगासने, मनोरे, झांजपथक, टिपरी नृत्य, लेझीम, गु्रप डान्स, मुलांचे बँडपथक, कार्यानुभव, शेती, मीनाराजू-मंच, विज्ञान प्रदर्शनात सहभाग वगैरेंतील प्रावीण्य वाखाणण्यासारखेच. वर्गसजावट तर उत्कृष्ट आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी हातमाग युनिट व काजू फॅक्टरीला भेट देऊन माहिती घेतली.