शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

‘महालक्ष्मी’चे स्वप्न अपुरेच

By admin | Updated: March 12, 2015 00:44 IST

सामान्यांच्या हिताला बाधा न आणता त्यांनी आयुष्यभर सहकारातही काम केले. केवळ महालक्ष्मी दूध संघाचे गालबोट त्यांना लागले, ही सल त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली.

राजाराम लोंढे- कोल्हापूर स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी संघर्षातून राजकारणातील सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली. सामान्यांच्या हिताला बाधा न आणता त्यांनी आयुष्यभर सहकारातही काम केले. केवळ महालक्ष्मी दूध संघाचे गालबोट त्यांना लागले, ही सल त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली. शेतकऱ्यांनी आपल्याकडे बघून पैसे दिलेत, त्यांचा विश्वासघात करणार नाही, दूध संघ पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न होता; पण त्यांचे स्वप्न अपुरेच राहिले. सदाशिवराव मंडलिक यांचे राजकीय जीवन आगामी पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे. राजकीय पाठबळ व घराणेशाही असेल तरच राजकारण करता येते, या सगळ्याला छेद देत मंडलिक यांनी आपली राजकीय कारकिर्द उभी केली. हे कोणालाही जमणार नाही. त्यासाठी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपली उभी हयात खर्ची घालावी लागते. ग्रामीण भागातील सामान्य माणसाला उभा करण्याचे काम मंडलिक यांनी केले. १९६० साली शिवराय एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कागल तालुक्यात विकास सेवा संस्था, दूध व पतसंस्थांचे जाळे विणले. कार्यकर्त्यांना संस्था काढून देत असताना त्याकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. सामान्य माणसाची नाळ या संस्थांशी जोडली असल्याने संस्थांकडे त्यांचे लक्ष असायचे. राजकीय संघर्ष करीत असताना त्यांनी संस्थात्मक पातळीवर कधीही तडजोड केली नाही. कागल तालुक्यातील ‘शाहू’, ‘बिद्री’ हे दोन सक्षम कारखाने असताना हमीदवाडासारख्या फोंड्या माळावर त्यांनी साखर कारखाना काढण्याचे धाडस केले. त्यांनी अत्यंत नियोजनबद्धपणे कारखाना चालविल्याने आज राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये ‘हमीदवाडा’ कारखान्याचे नाव घेतले जाते. जिल्ह्णातील दुधाचे उत्पादन पाहून त्यांनी महालक्ष्मी दूध संघाची स्थापना केली. हा संघ स्थापन करतानाही त्यांच्या वाटणीला मोठा संघर्ष आला. त्यातून दूध संघाची उभारणी केली. वाढते वय व खासदारकी यामुळे मंडलिक यांनी दूध संघाच्या कामकाजातील लक्ष कमी केले. याच काळात मंडलिक-मुश्रीफ गटांतील अंतर्गत संघर्ष खदखदू लागला. दूध संकलन कमी आणि प्रकल्पाचा खर्च वाढत गेल्याने संघ आर्थिक अरिष्टात सापडला आणि बंद पडला. ही सल मंडलिक यांच्या मनात कायम राहिली. सामान्यांचे पैसे अडकल्याची सल शेवटपर्यंत राज्यात व केंद्रात शिवसेना, भाजपचे सरकार आहे. संघाचे अध्यक्ष संजय मंडलिक यांचे पक्षात चांगले वजन आहे. त्याचा उपयोग करून सरकारकडून आर्थिक मदत घेऊन संघाला गतवैभव मिळवून देऊन सदाशिवराव मंडलिक यांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी कागल तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे.