केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात मंगळवारी पुकारलेल्या देशव्यापी ‘भारत बंद’ला कोल्हापुरात चांगला प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौकात भाजप वगळता अन्य सर्व पक्षांनी एकत्रित येऊन केंद्र शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला. ‘शेतकरी चंपाची चंपी केल्याशिवाय राहणार नाहीत,’ अशा घोषणांनी आंदोलस्थळ दणाणून गेले. (आदित्य वेल्हाळ)
------------------------------------------------------------
फोटो : ०८ कोल्हापूर ०३
कोल्हापुरात ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. रस्त्यांवर वर्दळ होती; परंतु व्यवहार पूर्ण बंद होते. शहरातील मध्यवर्ती असलेल्या कपिलतीर्थ मार्केटमध्ये असा शुकशुकाट होता. (आदित्य वेल्हाळ)
------------------------------------------------------------
फोटो : ०८ कोल्हापूर ०४
कोल्हापुरात नेहमी गजबजलेल्या महाद्वार रोडवर बंदच्या काळात दिवसभर असा शुकशुकाट होता. दुकानांना कुलपे लागली होती. व्यापाऱ्यांनी एक दिवस घरीच थांबणे पसंत केले. (आदित्य वेल्हाळ)
------------------------------------------------------------
फोटो : ०८ कोल्हापूर ०५
कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली भवानी मंडपातून भगवी रॅली काढून ‘बंद’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. (आदित्य वेल्हाळ)
------------------------------------------------------------
फोटो : ०८ कोल्हापूर ०६
कोल्हापुरात मंगळवारी केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात बंद पाळण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी हे त्यामध्ये हातात नांगर घेऊनच सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल न घेणाऱ्या केंद्र सरकारच्या पाठीत नांगराचा सोगा घातल्याशिवाय देशभरातील शेतकरी आता गप्प बसणार नाहीत, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. (आदित्य वेल्हाळ)
------------------------------------------------------------
फोटो : ०८ कोल्हापूर ०७
भजी पे चर्चा...
कोल्हापुरात मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. या दोघांत तासभर ‘भजी पे चर्चा’ रंगली होती. (आदित्य वेल्हाळ)