शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
5
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
6
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
7
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
8
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
9
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
11
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
12
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
13
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
14
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
15
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
17
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
18
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
19
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
20
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

कोल्हापूर-- करवीरसह पन्हाळा, गगनबावडा --साखर कारखान्यांच्या राजकारणाचाच प्रभाव

By admin | Updated: October 3, 2014 00:34 IST

तीन तालुक्यांचा समावेश : पाच कारखान्यांसह १०३ वाड्यांनी व्यापलेला मतदारसंघ

राजाराम लोंढे - कोल्हापूर-- करवीरसह पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातील १०३ वाड्यांनी हा मतदारसंघ व्यापला आहे. कार्यक्षेत्रातील पाच साखर कारखान्यांच्या सत्तेचे पडसाद या मतदारसंघात उमटत असतात. येथील निकाल हा कारखान्यांच्या राजकारणाभोवतीच फिरत असल्याने काटा लढत पाहावयास मिळते. पुनर्रचनेनंतर करवीरमध्ये दुसरी लढत होत असून, गेले लढतीत पी. एन. पाटील यांचा निसटता पराभव झाला होता; पण पाच वर्षांत अनेक संदर्भ बदलल्याने ही लढत रंगतदार होणार हे निश्चित आहे. जुन्या करवीर मतदारसंघातील ३४ गावे, जुन्या सांगरूळमधील ६० गावे, पन्हाळ्यातील ६२ गावे व गगनबावडा तालुका असा करवीर मतदारसंघ २००९ला तयार झाला. या मतदारसंघात ‘भोगावती’, ‘कुंभी’, ‘राजाराम’, ‘डॉ. डी. वाय. पाटील’ व ‘ दत्त-आसुर्ले’ या साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र येते. चंद्रदीप नरके, पी. एन. पाटील, संपतराव पवार, विनय कोरे, सतेज पाटील, पी. जी. शिंदे, महादेवराव महाडिक, स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांना मानणारे गट कार्यरत आहेत. पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्याच २००९ च्या निवडणुकीत येथे चंद्रदीप नरके व पी. एन. पाटील यांच्यात काट्याची टक्कर झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने घेतलेली दुटप्पी भूमिका, नरके यांनी तीन वर्षे घेतलेली मेहनत व पाटील यांनी फारशी गांभीर्याने न घेतलेली निवडणूक या सर्व कारणाने नरकेंनी बाजी मारली. यावेळी पाटील व नरके यांच्याबरोबर जनसुराज्य-शेकापचे राजू सूर्यवंशी यांनी दंड थोपटले आहेत. सध्या राष्ट्रवादीने सूर्यवंशी यांना पाठिंबा दिला असला तरी हा पाठिंबा देताना मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्याला विश्वासात घेतले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसने एकत्रित येत धनंजय महाडिक यांना ३३ हजारांचे मताधिक्य दिले होते. दोन्ही कॉँग्रेसबरोबर ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके सोबत होते. आता सर्वच समीकरणे बदलल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे. करवीर तालुक्यातील बहुतांश गावे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे या गावांच्या फारशा अपेक्षाही नसतात. येथील मतदान हे स्थानिक राजकारण व गटातंर्गतच होत असते. शहरालगतची गावे असल्याने करवीरमध्ये शक्यतो बेरोजगारीचा प्रश्न दिसत नाही; पण गगनबावडा तालुक्यात डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना सोडला, तर एकही नवीन प्रकल्प उभा राहिला नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. अजूनही येथील शेतकरी पारंपरिक शेतीवरच अवलंबून आहे. पाच वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा याचे प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागलेले आहेत. अनेक वाड्या-वस्त्यांवर अजूनही पाणी व रस्त्यांसारखे मूलभूत प्रश्न भेडसावत आहेत. पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला धामणी प्रकल्प गेले अनेक वर्षे रेंगाळलेला आहे. गेल्या निवडणुकीत तिन्ही उमेदवारांच्या अजेंठ्यावर धामणी प्रकल्प होता; पण त्याचा फारसा पाठपुरावा झालेला दिसत नाही. जिल्हा परिषद बलाबलविमल पाटील, शशिकला रोटे, शांताबाई कांबळे (कॉँग्रेस-‘पी. एन.’समर्थक), विलास पाटील, एस. आर. पाटील, बाजीराव पाटील, सुजाता पाटील (शिवसेना), मानसिंग पाटील (जनसुराज्य), मेघाराणी जाधव (राष्ट्रवादी), प्रिया वरेकर (काँग्रेस-सतेज पाटील समर्थक) व बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघ - सुवर्णा पाटील (शिवसेना).पंचायत समितीची सत्ता - करवीर- कॉँग्रेस, गगनबावडा-काँग्रेस (सतेज पाटील गट) सहकारात काँग्रेसचा दबदबाकरवीर मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आहेत. विकास सेवा संस्था, दूध संस्था, पाणीपुरवठा व पतसंस्थांवर निर्विवाद पी. एन. पाटील यांच्या गटांचे वर्चस्व आहे. ‘गोकुळ’ संचालकअरुण नरके (शिवसेना), विश्वास पाटील, सुरेश पाटील, निवास पाटील (कॉँग्रेस-‘पी. एन.’ समर्थक), बाबासाहेब चौगुले (कॉँग्रेस-सतेज पाटील समर्थक).बँका/कारखानेकुंभी बँक - चंद्रदीप नरके गट, यशवंत बँक - पी. एन. पाटील समर्थक.साखर कारखाने-भोगावती - राष्ट्रवादी काँग्रेसकुंभी - शिवसेनाडी. वाय. पाटील - काँग्रेसदत्त-आसुर्ले - दालमिया शुगर्सराजाराम - काँग्रेसविधानसभा मतदारसंघ क्रमांक २७५एकूण मतदारसंघ २ लाख ८८ हजार १७५जुना करवीर ९१ हजार ४९१जुना सांगरुळ १ लाख ४ हजार ५५७पन्हाळा६४ हजार ७९६गगनबावडा २४ हजार ९४१महिला मतदार १ लाख ३५ हजार ९६६पुरुष मतदार १ लाख ५१ हजार ४९२इतर १सर्व्हिस मतदार (महिला)२०८सर्व्हिस मतदार (पुरुष)४८७

 

निर्णायक मतांची गावेवडणगे१०२१०वाकरे ४४०७शिंगणापूर४२९५खुपिरे ४८८४प्रयाग चिखली४५१६शिये ६२५४निगवे दुमाला४७२२बालिंगा ३८९४सांगरुळ६६२२कसबा बीड ३०८९शिरोली दुमाला४२८१वाशी३८४४म्हाळुंगे ३३२३गगनबावडा१४७७यवलूज४५८०पडळ २९५८माजनाळ २२१३