शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता कायम राखत ‘ग्लोबल’ झेप घ्यावी

By admin | Updated: January 29, 2015 00:53 IST

एन. जे. पवार : निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य केली

संतोष मिठारी-कोल्हापूर -कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव यशस्वी करणे आणि विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणे ही उद्दिष्टे बाळगली होती. विद्यापीठाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन ही उद्दिष्टे साध्य केली. शिवाय देशात विद्यापीठाला गुणवत्तेसह लौकिक मिळवून दिला. गुणवत्तेसह लौकिकाचे स्थान कायम राखत विद्यापीठाने ‘ग्लोबल’ झेप घ्यावी, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी व्यक्त केली.विद्यापीठाचा ५१ वा दीक्षान्त समारंभ उद्या, गुरुवारी होणार आहे. कुलगुरू डॉ. पवार यांच्या कारकिर्दीतील हा त्यांचा अखेरचा दीक्षान्त समारंभ. त्या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत विद्यापीठातील कामगिरीचे विविध पैलू त्यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून उलघडले.‘ग्रामीण चेहरा असलेले विद्यापीठ’, नाव घेताच वेगळ्या नजरेने पाहण्याचा विद्यार्थ्यांना आलेला अनुभव, केली जाणारी कुचेष्टा, या विद्यापीठाची पदवी असेल, तर नोकरी देताना दिली जाणारी बगल, अशा स्वरूपातील विद्यापीठाबाबतचे गैरसमज दूर करणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक, संशोधनाला गती देणे, आदी स्वरूपातील आव्हाने कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माझ्यासमोर होती, असे डॉ. पवार यांनी सांगितले. अशा स्थितीत बदलत्या काळाची गरज ओळखून अभ्यासक्रमांची पुनर्रचना, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक प्रणाली, भक्कम प्रशासकीय कामकाज, संशोधनात वेगळेपण, आदींच्या माध्यमातून प्रशासन, यंत्रणा कार्यान्वित केली. २०१४ मध्ये ‘अ’ मानांकन मिळवायचे, या ध्येयाने विद्यापीठातील प्रत्येक घटकाने तयारी केली. नवीन अभ्यासक्रम, अंतर्गत सुविधा, अध्यायन-अध्यापन आणि मूल्यमापन, आदी मुद्द्यांवर सरस कामगिरी करत सर्वाधिक गुणांकनासह ‘अ’ मानांकन पटकाविले. गुणवत्ता सिद्ध करत राज्यातील अन्य विद्यापीठांना मागे टाकत विविध स्वरूपांतील असलेले गैरसमज पुसून टाकले आहेत. गुणवत्तेच्या स्पर्धेत विद्यापीठ उतरले आहे. कार्यभार स्वीकारला त्या दिवसापासून ‘लोकल टू ग्लोबल’ असे ध्येय घेऊन काम करण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यावर ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळाले. बदलत्या परिस्थितीचा वेध घेऊन शिवाजी विद्यापीठाने ‘ग्लोबल’ झेप घ्यावी. शिवाय गुणवत्तेबाबतचे स्थान कायम राखावे, अशी या विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि येथून निरोप घेतानाची माझी अपेक्षा असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.‘सुवर्ण महोत्सवी’ निधीची खंत...विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सव धडाक्यात साजरा झाला. त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविले. शिवाय राज्य शासनाकडून ४५ कोटींचा विशेष निधी विद्यापीठाला जाहीर झाला; पण राज्य शासनाकडून जाहीर झालेला सुवर्णमहोत्सवी निधी पूर्णपणे माझ्या कारकिर्दीत मिळाला नाही. त्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत असल्याची खंत डॉ. पवार यांनी व्यक्त केली. कुलगुरूंची कामगिरीगेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेली शिक्षक आणि शिक्षकेतर पदांची भरती करून शैक्षणिक आणि प्रशासकीय गुणवत्तेला ‘बुस्ट’ दिले.जैवतंत्रज्ञान विभागाला बळ दिल्याने देशातील ‘टॉप टेन’मध्ये या विभागाने स्थान पटकविले. विविध संशोधनविषयक उपक्रम राबविल्याने विद्यापीठाने संदर्भमूल्याधिष्ठित संशोधनात १४ वे स्थान पटकाविले.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुदानातून मनुष्यबळ, स्वयंअध्ययन साहित्य निर्मितीसाठी दूरशिक्षण केंद्राला बळ दिले.पन्हाळगडावरील अवकाश संशोधन केंद्राद्वारे विद्यापीठाच्या नव्या विद्याशाखेचा प्रारंभ.राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाशी सामंजस्य करार करून विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांना अभिनव व नावीन्यपूर्ण संशोधनाची संधी उपलब्ध करून दिली. तीन महिने चालणाऱ्या परीक्षांचा कालावधी ६० दिवसांवर आणून परीक्षा विभागाने वेळ, पैशांच्या बचतीचे पाऊल टाकले. ग्रीन आॅडिट, वॉटर आॅडिट व ‘नो व्हेईकल डे’, क्रांतिवनाच्या अद्ययावतीकरणातून पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न केले. प्रशासन, परीक्षा प्रक्रियेत ‘आयटीसी’चा वापर वाढविला.