चंदगड : चंदगड येथील तहसील कार्यालयातील रोजंदारी कर्मचारी असलेला तावरेवाडी येथील युवक भैरू कागणकर याला २० हजारांची लाच घेताना काल, शुक्रवारी लाचलुचपत विभागाने पकडले होते. नामानिराळा राहिलेला याच कार्यालयातील लिपिक सुनील घाग यालाही आज, शनिवारी अटक केली. या दोघांना गडहिंग्लज येथील विशेष न्यायालयाने सोमवार (दि. २ जून) पर्यंत पोलीस कोठडी दिली. हलकर्णी (ता. चंदगड) येथील १२ एकर १२ गुंठे जमीन यशवंत आवडण व त्यांचे भाऊ यांच्याकडे कसण्यात आहे. त्यावर आवडण संरक्षित कूळ म्हणून नावे आहेत. जमिनीबाबत मालकीवादातून प्रमाणपत्र मिळण्याकरिता तहसील कार्यालयातील लिपिक घाग व हंगामी कर्मचारी भैरू कागणकर यांनी यशवंत आवडण यांच्याकडे लाखाची मागणी केली होती. लाच घेताना रंगेहात पकडले होते. (प्रतिनिधी)
कागणकर, घाग यांना पोलिस कोठडी
By admin | Updated: June 1, 2014 01:29 IST