शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

‘उत्तर’चा एकच आदेश, पुन्हा एकदा राजेश...!

By admin | Updated: October 20, 2014 00:44 IST

२२ हजार ४२१ चे मताधिक्य : शिवसेनेच्या झंझावातापुढे काँग्रेसचा दारुण पराभव

पैसा की स्वाभिमान याचा फैसला करणाऱ्या कोल्हापूर उत्तरमधील निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने स्वाभिमानाच्या बाजूने निकाल देत शिवसेनेच्या राजेश विनायक क्षीरसागर यांना तब्बल २२ हजार ४२१ इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून दिला. शिवसेनेच्या झंझावातापुढे काँग्रेस उमेदवार सत्यजित ऊर्फ नाना शिवाजीराव कदम यांचा टिकाव लागला नाही. क्षीरसागर यांचा हा सलग दुसरा विजय असून, त्यांनी आपला विजय हा स्वाभिमानी जनतेला तसेच सहकार्य करणाऱ्या शिवसैनिकांना अर्पण केला आहे.भारत चव्हाण - कोल्हापूरकोल्हापूर शहरातील मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात नेहमीच यशाचे झुकते माप टाकले आहे. राजेश क्षीरसागर यांचा विजय हा अपेक्षित मानला जात होता. त्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेले काम, आंदोलनाच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर उठविलेला आवाज, चांगला जनसंपर्क याच्या जोरावर दुसऱ्यांदा मुसंडी मारली अन् हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.क्षीरसागर यांच्यासमोर काँग्रेसच्या सत्यजित कदम यांनी प्रचाराच्या माध्यमातून मोठे आव्हान उभे केले होते. हवा तापविली होती, परंतु हे आव्हान म्हणजे एक आभास होता हेच निकालावरून स्पष्ट झाले. कोल्हापूर उत्तरमधून दीर्घ काळानंतर निवडणूक रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महेश बाळासाहेब जाधव यांनी तब्बल ४० हजार १०४ मते घेऊन सर्वांचेच लक्ष वेधले, परंतु गेली पंधरा वर्षे राज्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या राऊसाहेब खंडेराव तथा आर. के. पोवार यांना जनतेने चांगलेच फटकारले. आर. के. यांना केवळ ९,८८७ इतकी मते मिळाली. मोदी, सोनियांचा प्रभाव शून्य कोल्हापूर उत्तरमधील प्रचाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॉँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी कोल्हापुरात सभा घेतल्या. विजयाबाबत उत्सुकता होती. मोदी यांच्या सभेमुळे मतदार भाजपच्या पारड्यात मते टाकतील, असा दावा केला जात होता, परंतु या दोन्ही नेत्यांचा प्रभाव मतदारांवर पडला नाही. उलट शिवसेनेला सहानुभूती होती हेच दिसून आले.डाव्या पक्षांची वाताहत शहरातील सर्वसामान्य जनतेच्या अनेक प्रश्नांवर सतत आंदोलनात आग्रही असणाऱ्या आणि श्रमिक, कष्टकऱ्यांसाठी झगडणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची या निवडणुकीत चांगलीच वाताहत झाली. भाकपच्या रघुनाथ कांबळे यांना या निवडणुकीत फक्त १,५०४ मते मिळाली. ‘एकेकाळचा बालेकिल्ला’ असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मनीष महागावकर यांना तर केवळ १९९ मते पडली.पहिल्या पाच फेरीतच चुरस मतमोजणी सुरू झाली आणि पहिल्या फेरीतच शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी १५२८ इतक्या मतांची आघाडी घेऊन खाते उघडले. पहिल्या पाच फेऱ्यांत क्षीरसागर व कदम यांच्यात चुरस दिसली. सातव्या फेरीत कदमवाडी जाधववाडी भागातील मतदानयंत्रे लागताच क्षीरसागर यांचे मताधिक्य ३०० पर्यंत घसरले. घालमेल सुरू झाली, पण आठव्या फेरीनंतर क्षीरसागर यांनी कदम यांना मागे टाकण्यास सुरुवात केली. शेवटच्या २१ व्या फेरीवेळी हे मताधिक्य २२ हजार ४२१ वर जाऊन पोहोचले.क्षीरसागर जिंकल्याची कारणे टोल, एलबीटी आंदोलनात सक्रिय राहिल्याचा लाभगेल्या पाच वर्षांत जनसंपर्क चांगला ठेवलामहिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून तरुणांचे शिवसेनेबद्दलचे आकर्षण सत्यजित कदम यांच्या पराभवाची कारणेटोल, एलबीटीवरून काँग्रेसविषयी तीव्र नाराजीकाँग्रेस नगरसेवक, कार्यकर्ते प्रचारापासून अलिप्तशहराच्या सर्व भागांत पोहोचण्यात अडचणीकाँग्रेस नेत्यांकडून फसवणुकीची शक्यता काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गायब क्षीरसागर यांचे मताधिक्य घटत नाही, उलट ते वाढतच असल्याचे लक्षात येताच १५व्या फेरीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी कक्षातून काढता पाय घेतला. १९ व्या फेरीचा कल पाहून काँग्रेसचे मतमोजणी प्रतिनिधीही केंद्रातून बाहेर पडले. त्याच्या आधी भाजपचे प्रतिनिधीही बाहेर पडले होते. २० व २१ वी फेरी तर केवळ शिवसेनेच्या प्रतिनिधींसमक्षच मते मोजण्यात आली. राजेश क्षीरसागर यांचे मताधिक्य पहिल्या फेरीपासून वाढत होते, ते शेवटच्या फेरीपर्यंत वाढतच राहिले.टपाली मतमोजणीतही राजेशच टपाली मतांची मोजणी स्वतंत्र दोन टेबलांवर करण्यात आली. मतपत्रिकांची छाननी करून त्यांची मोजणी करण्यास विलंब लागला. सकाळी आठ वाजता सुरू झालेली ही मोजणी पूर्ण व्हायला दुपारचे बारा वाजले. एकूण ६०२ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी ९५ मतपत्रिका अवैध ठरल्या, तर ५०७ मतपत्रिका वैध ठरल्या. त्यातील सर्वाधिक मते ही राजेश क्षीरसागर यांना १६० पडली. सत्यजित कदम यांना १५४, महेश जाधव यांना ५९, आर. के. पोवार २४, संभाजी देवणे, सुरेश साळोखे यांना प्रत्येकी ३, तर रघुनाथ कांबळे २ डी. श्रीकांत यांना १ अशी मते मिळाले.