शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

माहिती अधिकारात ‘बांधकाम’चा सावळागोंधळ

By admin | Updated: March 12, 2015 23:55 IST

एकाच योजनेची दोघांना दिली वेगळी माहिती : शिरढोण, टाकवडे पाणी योजनेतील नुकसानभरपाईच्या रकमेत तफावत

कुरूंदवाड : राष्ट्रीय ग्रामीण नळ  पाणीपुरवठा योजनेतून शिरढोण व टाकवडे (ता. शिरोळ) गावांसाठी कृष्णा नदीतून पाणी योजनेचे काम सुरू आहे. या पाईपलाईनसाठी रस्त्याची खुदाई केल्याने नुकसान भरपाईपोटी सार्वजनिक बांधकाम विभागाने माहितीच्या अधिकाराखाली दोघा तक्रारदारांना वेगवेगळी माहिती दिली आहे. यामध्ये तब्बल ३० लाख रूपयांचा फरक असून यातून सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पंचगंगेच्या प्रदूषित पाण्यापासून सुटका मिळावी व पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी शिरढोण व टाकवडे गावाला कृष्णा नदीतून पाणी योजना केली जात आहे. दोन गावांसाठी स्वतंत्र योजना असताना एकाच चरीतून केलेली पाईपलाईन, निविदेप्रमाणे कामात त्रुटी, अशा विविध कारणांतून ही योजना गाजत असून, योजनेचे काम रडत-खडत चालू आहे. मात्र, याचा विरोध अद्याप संपला नसून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नुकसान भरपाईच्या सावळागोंधळाने वादात भर पडली आहे. या योजनेतील पाईपलाईनसाठी रस्त्याकडेने खुदाई केल्याने रस्त्याचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या या रस्त्याच्या नुकसान भरपाई पोटी किती रकमेचा दंड करण्यात आल्याची माहिती टाकवडे येथील मारूती जनवाडे यांनी माहिती अधिकारात २२ आॅगस्ट २०१४ ला मागणी केल्यानुसार जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयाने कुरूंदवाड ते शिरढोण २४०० मीटर व कुरूंदवाड ते टाकवडे ८५०० मीटर असा एकूण दहा हजार ९०० मीटर रस्त्याचे नुकसान झाले असून, प्रत्येक मीटरला २७५ प्रमाणे २९ लाख ९७ हजार पाचशे रुपयांसह एकूण ३२ लाख १५ हजार ५०३ रूपये दंड केला. तर सदाशिव पाटील यांनी २० जानेवारी १५ ला बांधकाम विभाग कोल्हापूरकडे मागणी केल्यानंतर रस्त्याचे केवळ ५० मीटरच नुकसान झाले असून दोन लाख २५ हजार ५६३ रूपये दंड आकारल्याचे माहिती दिली आहे.पाणीपुरवठा विभागात प्रत्यक्षात एक लाख ३३ हजार ९६३ रूपये सार्वजनिक विभागाकडे भरले आहेत. एकाच विभागाने माहिती अधिकारातून दोन वेगवेगळ्या दंडात्मक कारवाईची माहिती दिल्याने तसेच त्यामध्ये तब्बल ३० लाखांचा फरक असल्याने नुकसान अचानक कमी होण्यामध्ये काय गौडबंगाल आहे, असा सवाल आंदोलनकर्ते करत आहेत. त्यामुळे यामध्ये काहीतरी पाणी मुरत असल्याचा आरोप करत योजनेविरोधी आंदोलनकर्त्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळे या प्रश्नावरून सार्वजनिक बांधकाम विभागालाच धारेवर धरण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)...तर आमचा विरोधचगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी पाणी योजना महत्त्वाची आहे. केवळ योजना पूर्ण होण्यापेक्षा ती टिकावू होणे गरजेचे आहे. मात्र, या योजनेच्या माध्यमातून भ्रष्ट कारभार करत ग्रामस्थांच्या जिवाशी खेळत कुचकामी योजना होत असेल, तर त्याला आमचा विरोधच राहील.- अमोल चौगुले, उपसरपंच ग्रामपंचायत टाकवडेकोणताही गैरव्यवहार नाहीयोजनेमुळे रस्ता कॉँसिंग, साईटपट्ट्या याचा अंदाजे खर्च दाखविला आहे. ही नुकसान भरपाई नसून रस्त्यांचे नुकसान संबधित ठेकेदाराने पूर्ण करून द्यावयाची आहे. रकमेच्या तफावतीमध्ये गैरव्यवहार नाही. रस्त्याच्या खर्चाच्या मूल्यांकनाचे अधिकार बांधकाम विभागाकडेच आहेत. रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीची रक्कम पाणीपुरवठा विभागाने बांधकाम विभागाकडे भरली आहे.- कुमार गुळवे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, जयसिंगपूर