शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

गूळ उत्पादकांवर अस्मानी संकट

By admin | Updated: December 11, 2014 00:01 IST

प्रतिक्विंटल २२०० रुपयांपर्यंत दरात घसरण : दर व्यवस्था निर्माण करण्याची मागणी

प्रकाश पाटील - कोपार्डे -शेतकऱ्यांच्या मालास हक्काची बाजारपेठ असावी म्हणून बाजार समिती, तर हमी भाव व पैशाची हमी मिळावी म्हणून नियमन अशी रचना करण्यात आली होती. याबाबत छत्रपती शाहू महाराजांनी प्रथम पाऊल उचलत बाजारसमितीची स्थापना केली. मात्र, मूठभर लोकांच्या हितासाठी व स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी राजकारण्यांनी शेतकऱ्यांनाच वाऱ्यावर सोडल्याचे चित्र सध्या बाजार समितीत दिसत असून, गुळाचे दर २२०० प्रति क्विंटलवर घसरले असताना व शेतकऱ्यांच्या गूळ विक्रीला हमी देण्याला ‘ना शासन ना राजकीय नेते’ पुढे येत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.कोल्हापूर बाजार समितीला सेसच्या रूपाने अडीच कोटींचे उत्पन्न केवळ गुळाच्या खरेदी व्यवहारातून मिळते. मात्र, शासनाने गूळ शेती मालावरील नियमन रद्द केले. त्याचबरोबर अडत पद्धतही बंद केली. यामुळे गूळ कुठेही विकण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळाला, तरी अचानक हा झालेला बदल व त्यासाठी शेतकऱ्यांना विक्री व्यवस्थेचे असलेल्या अज्ञानामुळे व्यापाऱ्यांनी एकी करत शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार सुरू आहे. तर अडत बंद केल्यामुळे बाजारसमितीत गूळ उत्पादकांना विक्रीसाठी गोदामांची उपलब्धता व विक्री होणाऱ्या गुळाच्या पैशाची हमी बंद झाली. यामुळे गूळ उत्पादक दुहेरी संकटात सापडला आहे. २६00 ते २७00 प्रतिक्विंटल असणारे दर सध्या २२०० रुपयांपर्यंत घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस गुऱ्हाळघरांकडे गाळप करण्याऐवजी साखर कारखान्याकडे वळविला आहे. जेणेकरून पैशाला हमी तरी मिळेल. हा विश्वास आहे. यासाठी गूळ व गुऱ्हाळ वाचवायची असतील, तर शासनाने विक्री व्यवस्था करावी, अशी मागणी गूळ उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.सहकारमंत्री पुढाकार घेणार काय ?कोल्हापुरी गूळ हा कुटिरोद्योग आहे. याची ख्याती सातासमुद्रापार आहे. तो वाचवायचा झाला, तर राजकीय इच्छाशक्तींना सहज शक्य आहे. आज जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे चार ते पाचच आमदार आहेत. तर खुद्द सहकार व पणनमंत्रीच या जिल्ह्याचे आहेत. यामुळे सहकारमंत्री असणारे चंद्रकांत पाटील गुळासाठी मार्केटिंग फेडरेशन अथवा स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करतात काय व प्रा. एन. डी. पाटील यांचा कित्ता गिरवतात काय, याकडे गूळ उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.दर पाडण्याचा प्रकारप्रा. एन. डी. पाटील सहकारमंत्री असताना व्यापाऱ्यांकडून अशीच एकी करून गुळाचे दर पाडण्याचा प्रकार होत होता. त्यावेळी प्रा. एन. डी. पाटील यांनी गूळ विक्रीसाठी मार्केटिंग फेडरेशनला व गुजरातमधील व्यापाऱ्यांना भाग घेण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी ८० रुपये प्रतिक्विंटल असणारा गूळ १०० रुपये ते १२० रुपयांवर पोहोचला आहे. त्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये गूळ व्यापारासाठी मिळतो की नाही अशी संभ्रमावस्था निर्माण झाली. यामुळे व्यापाऱ्यांनीही नरमाईचे धोरण घेत शेतकऱ्यांच्या गुळाला योग्य व माफक दर देऊ केला.कोल्हापुरी म्हणून विक्रीसध्या गुळाला चांगला दर नसल्याने गुळाची आवक मंदावली आहे. मात्र, ग्राहकांना कर्नाटकी गूळ कोल्हापुरी म्हणून माथी मारला जात असून, याला शासनाचे मानांकन असूनही शासकीय पातळीवर असलेल्या उदासिनतेमुळे अशा प्रकारावर कारवाईचा कुठेही प्रकार झाल्याचे उदाहरण मिळत नाही.