शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

शासनाची ‘वृक्ष लागवड’ मातीमोल

By admin | Updated: March 20, 2017 23:29 IST

देखभाल नाही : पाण्याअभावी अनेक ठिकाणची रोपे सुकली

विक्रम पाटील--  करंजफेणएका वर्षामागे पावसाचे प्रमाण अचानकपणे तुरळक झाल्यामुळे सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. पाऊस कमी होण्याचे मुख्य कारण बेसुमार वृक्षतोड हे शासनाच्या लक्षात आल्यामुळे मागील वर्षी राज्यभर मोठा गाजावाजा व जनजागृती करून १ जुलैला राज्यात एक कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली. या दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याला आठ लाख आठ हजार ५७७ रोपे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. वनविभाग, सामाजिक सेवाभावी संस्था, शाळा, ग्रामपंचायती व काही व्यक्तिगत पातळीवरील लोकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आठ लाख २२ हजार रोपांची लागवड केली. मागील वर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे लावण केलेली रोपे चांगलीच तरारली. दरम्यानच्या काळात लागवडीपैकी ७० टक्के रोपे जगली होती; परंतु वृक्षसंगोपनाकडे सर्वच सरकारी, निमसरकारी कार्यालयांनी दुर्लक्ष केल्यामुळे पाण्याअभावी अनेक ठिकाणची रोपे सुकून गेली. ग्रामीण भागामध्ये शाळा व ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष लावणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मदतीने शिक्षकांनी काही प्रमाणात रोपे जिवंत ठेवल्याचे दिसत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला कमीत कमी शंभर वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, कर्मचारी व ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षामुळे काही तुरळक ग्रामपंचायती वगळता बहुतांश पंचायतींनी शासनाच्या वृक्षलागवड योजनेचा बोऱ्या उडविला आहे. वृक्षलागवड उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व सरकारी कार्यालयांना अहवाल देण्याचे बंधन घातले होते; परंतु अनेक कार्यालयांनी अहवालच पाठविला नसल्याचे समोर येत आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडे सर्व्हे करण्यात पुरेशी यंत्रणा नसल्याचे समजते. बहुतांश कार्यालयातून या योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही मोहीम फोटोसेशनसाठी तर राबविण्यात आली नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. वृक्ष लागवडीसाठी योग्य नियोजनाची प्रामुख्याने गरज असते. आॅक्टोबर ते मे महिन्याच्या दरम्यान रोपांना पाणी घालणे, भांगलण करून कुंपण करण्याची खरी गरज असते. वेळच्यावेळी पाणी घातल्यास शासनाची योजना सफल तर होईलच, परंतु पर्यावरणामध्ये समतोल राहण्यास मोठा फायदा होईल.-सरदार रणदिवे, पर्यावरण, अभ्यासक. वृक्ष लागवड हा उपक्रम चांगल्या प्रकारचा असून, प्रत्येक वर्षी राबविण्याची गरज आहे. आमच्या कळे (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीने शंभर वृक्षांची लागवड केली होती. त्यापैकी ८० रोपे पूर्णपणे जगली आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीने आपली मुख्य जबाबदारी म्हणून काम केल्यास शासनाचे उद्दिष्ट साध्य होण्यास वेळ लागणार आहे.-बाजीराव गायकवाड, ग्रामसेवक, कळे, ता. पन्हाळा.