टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील सुपुत्र प्रशांत निर्मळे हे फिरोजपूर-पंजाब येथील सैन्य दलात कार्यरत होते. सुट्टीसाठी घरी येत असताना मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे त्यांचे अपघाती निधन झाले. आज दुपारी एक वाजता त्यांचे पार्थिव टाकळीवाडी येथे आणण्यात आले
यावेळी वीरपत्नी विद्या निर्मळे यांनी फोडलेला हंबरडा काळीज हेलावणारा होता, तर सहा वर्षाची स्वरा व दीड वर्षाची निरांजनी या दोन मुली एवढे लोक आपल्या घरी आलेत यामुळे बावरलेल्या अवस्थेत सर्वत्र पाहात होत्या.
निर्मळ यांच्या घरापासून सैन्यदलाच्या फुलांनी सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. गावातील ग्रामपंचायत चौक, बस स्थानक, शिवाजी चौक, मुख्य रस्त्याने फुलांची उधळण करत व देशभक्तीपर गीते व जयघोष करत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. सेवन महार रेजिमेंटच्या कॅप्टन अर्चना यांच्या पथकाने त्यांना मानवंदना दिली. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, नायब तहसीलदार प्रकाश आरगे, कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सपोनि अमित पाटील, गावच्या सरपंच मंगला बिरणगे, वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत हांडे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष दादा खोत, सैनिक टाकळीचे के. टी. पाटील, सभापती दीपाली परीट, माजी सभापती मीनाज जमादार, मंडल अधिकारी विनायक माने, गुरुदत्तचे विकास चौगुले, पोलीसपाटील सुनीता पाटील, ग्रामसेवक एन. एच. मुल्ला, पास रेस्क्यू फोर्स जवान व्हाईट आर्मी जवान बाजीराव गोरे, बाबासोा वनकोर, पिनो जमादार, कुशाल कांबळे, भरत पाटील, भरत निर्मळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.