कोल्हापूर : घरफाळा दंड व्याज सवलत योजनेला १५ दिवसांची मुदत वाढ द्या, अशी मागणी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते शारंगधर देशमुख यांनी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
घरफाळा १०० टक्के वसूल होण्यासाठी प्रशासक डॉ. बलकवडे यांनी थकबाकीदारांच्या दंड व्याजात सवलत देण्याची योजना सुरू केली आहे.
एक हजार चौरस फुटांच्या आतील मिळकतधारकांसाठी ३१ जानेवारीपर्यंत घरफाळा जमा केल्यास दंड व्याजात ७० टक्के, २८ फेब्रुवारीपर्यंत घरफाळा जमा केल्यास दंड व्याजात ६० टक्के आणि ३१ मार्चपर्यंत जमा केल्यास दंड व्याजात ५० टक्के सवलत आहे. एक हजार चौरस फुटांवरील मिळकतधारकांसाठी ३१ जानेवारीपर्यंत ५० टक्के, २८ फेब्रुवारीपर्यंत ४० टक्के आणि ३१ मार्चपर्यंत ३० टक्के सवलत आहे. ही योजना नागरिकांना दिलासा देणारी असून, थकबाकी वसूल होण्यास मदत होणार आहे. नागरी सुविधा केंद्रात इतरही पैसे जमा करण्यासाठी गर्दी होते. ऑनलाईनवरून घरफाळा जमा करण्यास तांत्रिक अडचणी येतात. मुदत संपत जाणार तशी सुविधा केंद्रांवर गर्दी वाढून नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.