शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी मजुरांचा शेतकऱ्यांना जाच

By admin | Updated: November 21, 2015 00:15 IST

टनाला ५0 ते १०० रूपयांचा फटका : प्रत्येक गाडी, ट्रॅक्टरमागे खुशालीची मागणी

चंद्रकांत पाटील-- गगनबावडा : गेल्या काही वर्षापासून ऊसतोडणी मजुरांना प्रत्येक गाडीमागे पैसे देण्याचा एक नवीनच पायंडा पडला आहे. लाच घेतल्याशिवाय ते फडाला हात लावत नाहीत. हे कारखान्याला माहीत असूनही ते संबंधितांवर कारवाई करीत नाहीत. त्यामुळे या मजुरांचे फावले आहे. लाच दिल्याने शेतकऱ्यांना सरासरी टनाला ५० ते १०० रूपयांचा फटाक बसतो. गळीत हंगाम सुरू झाला की सुरूवातीचे काही दिवस पैस न घेता मजुर तोडणी करतात नंतर मात्र ट्रक व ट्रॅक्टरला ५०० ते १००० रू असा लाचेचा दर पाडतात. शेतकरी ऊसाला तोडणी आल्यावर पैसे देण्यास नकार देवू लागला तर सरळ ऊस न तोडण्याची धमकी देतात. त्यामुळे हाता पाया पडून आणलेली तोडणी परत जाऊ नये म्हणून शेतकरी नाईलाजास्तव पैसे द्यायला तयार होतात. काही मोठ्या शेतकऱ्यांना पैसे देण्यास जरी परवडत असले तरी लहान शेतकऱ्यांना म्हणजे दहा गुंठे, अर्धा एकर किंवा एकरभर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला पैसे देणे परवडत नाही. तोडणीसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई म्हणून कारखाना व्यवस्थापनाला शेतकरी संघटनेने जाब विचारावा, अशी मागणी होत आहे. तसेच कारखान्यानेही याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी होत आहे. +रस्सामंडळ गेले : अ‍ॅडव्हान्स आलायापूर्वी ऊसाला तोड येते तेंव्हा शेतकरी ऊसतोडणी मजुरांना सकाळच्या वेळेत चहा-वरकी, बटर द्यायचा. ऊसाचा फड संपल्यावर खुशीने एखादा प्रोग्राम (रस्सामंडळ) द्यायचा. मजूर या चहा व रस्सामंडळावर खुश असायचे. पण आता पूर्ण परिस्थीती बदलली आहे. पैसे दिल्याशिवाय ऊस तोडला जात नाही. पैसे आगाऊ (अ‍ॅडव्हान्स) मध्ये घेतले जातात. कारखान्याकडे याबाबत तक्रार केल्यास फडकरी किती पैसे मागतोय ते मुकाटपणे दे जा आणि ऊस तोडणी घेजा, असा सल्ला मुकादम देत असल्याने शेतकरी गप्प बसतो. त्यातच तोडणी आल्यावर फडकरी ऊसाच वाडे ऊसाचे वाडे शेतकऱ्याला (ऊस मालकाला) देत नाहीत. वाडे विकून बक्कल पैसा कमवतात. म्हणजेच शेतमजुरांना ऊसतोडणीची मजूरी, ऊसाचे वाडे विकून व उसतोडणीसाठी लाच घेऊन असा तिहेरी लाभ मिळतो.