कोल्हापूर : दिंडनेर्ली येथील दहावीतील ज्योती पाटील ही हृदयविकारने त्रस्त असल्याने तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्र्रखर इच्छाशक्ती, शिक्षणाच्या ध्यास यांच्या जोरावर हृदयविकाराच्या मरणयातना सहन करूनही ‘ती’ दहावीची परीक्षा रुग्णवाहिकेतून जाऊन देत आहे. यासाठी तिला रोज २० ते २५ किलोमीटर प्रवास करून परीक्षा केंद्रात जावे लागत होते. याबाबत शिवसेना जिल्हा संघटक शुभांगी साळोखे यांनी मंडळाचे सचिव शरद गोसावी यांची भेट घेऊन रुग्णालयातच परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली. त्याप्रमाणे गोसावी यांनी तिचे उर्वरित पेपर रुग्णालयात घेण्यात परवानगी दिली.
ज्योती देणार रुग्णालयातच परीक्षा
By admin | Updated: March 12, 2015 00:15 IST