शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

आठ महिन्यांत सात बालके झाली ‘नकोशी’

By admin | Updated: December 10, 2014 00:02 IST

‘बालकल्याण’मध्ये मायेचे छत्र : कायदेशीर प्रक्रियेनंतर दिले जाते दत्तक

इंदुमती गणेश- कोल्हापूर -बालपण हे फुलपाखरासारखं असतं, असं म्हणतात. मन कधी या वेलीवर कधी त्या. पण ते अनुभवण्याआधीच टाकलेपणाचे ओरखडे म्हणजे त्यांच्या भावविश्वाचा विध्वंसच . दुपट्यात लपेटलेले निरागस बाळ जोरजोराने आक्रंदत असते. कधी ते रस्त्यावर टाकलेले असते तर कधी नदीकाठी, कधी रेल्वेस्टेशनवर, तर अगदी कचराकुंडीतसुद्धा. काही धडधाकट तर काही अत्यवस्थ. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत विविध कारणांमुळे अशी नकोशी झालेली सात नवजात अर्भके येथील बालकल्याण संकुलात दाखल झाली आहेत. काल शिरोली परिसरात पंचगंगा नदीकाठाजवळ पंचवीस दिवसांचे स्त्री जातीचे नवजात अर्भक पोलिसांना सापडले. सध्या त्याच्यावर सीपीआरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कायदेशीर बाबींची पूर्तता होऊन या बाळास बालकल्याण संकुलमध्ये पाठविण्यातयेणार आहे. काही महिन्यांपूर्वी एका प्राध्यापिकेने बाळ रस्त्यावर टाकण्याचा प्रयत्न केला पण हे करताना ती सापडली. कारणमिमांसा झाली तेव्हा बाळाचा बाप त्याची जबाबदारी सांभाळायला तयार नव्हता, असे समजले. अनेक कारणांनी लहान बाळांना रस्त्यात टाकून दिले जाते. पण जर मूल सांभाळणे शक्यच नसेल तर त्याला कुठेही टाकण्यापेक्षा संस्थेकडे रितसर देणे कधीही योग्य. पालक म्हणून आपण कितीही अगतिक असलो तरी शेवटी प्रश्न येतो की या सगळ््यात त्या बाळांचा दोष काय..? एकदा मूल सापडले की पोलिसांना त्याच्या पालकांना शोधण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी दिला जातो. यादरम्यान पालकांना चूक उमगली ते परत आलेच तर बाळाला पुन्हा मायेची ऊब मिळते पण असे नाही झाले की मूल बेवारस घोषित केले जाते. त्यानंतर हे मूल अन्य कोणालाही दत्तक देता येते. आता बालकल्याण संकुल किंवा शिशुआधार केंद्र अशा संस्थांमध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील बाळांना सांभाळले जाते. त्यामुळे मूल नकोच असेल तर त्यांना कुठेही टाकून देण्यापेक्षा अशा संस्थांमध्ये रितसर दाखल केले पाहिजे. माताच ठरते दोषीबेवारस अवस्थेत बाळ सापडले की त्याचे खापर आईवर फोडले जाते. ‘माता न तू वैरीणी’ किंवा ‘दगडाच्या काळजाची’ अशी काही विशेषणे लावली जातात पण मूल ही फक्त आईची नव्हे तर वडिलांचीही जबाबदारी असते. एखादी स्त्री फसवली गेली असेल तर तितकाच दोषी पुरुषही असतो. आधीच फसवणूक, अवहेलना बाळंतपणाच्या कळा झेललेल्या त्या स्त्रीला मूल सोबत घेऊन समाजात जगूच दिले जात नाही. अशावेळी मूल रस्त्यावर टाकताना किंवा संस्थेत सोडताना त्या आईच्या काळजाचे दु:ख कधी समजूनच घेतले जात नाही. पुरुषांना मात्र या सगळ््याच दोषातून मुक्तता. ही विषमताच बालकांच्या या अवस्थेला कारणीभूत ठरते. जंतूसंसर्ग आणि उपचार या नवजात बालकांना रस्त्यावर किंवा घाणीच्या ठिकाणी ठेवून गेले की काहीवेळा कुत्रे बाळाचे लचके तोडण्यासही कमी करत नाहीत. काहीवेळा बाळांना जंतुसंसर्ग झालेला असतो, आजारी पडलेली असतात..अशा अवस्थेत बाळ सापडल्यानंतर सीपीआरमध्ये त्याच्यावर उपचार करावे लागतात नंतर हे बाळ बालकल्याण समितीकडे पाठविले जातात. त्यानंतर बाळ आजारी पडले किंवा दुर्धर आजार झाला असेल तर बालकल्याणच्यावतीनेही मोठ्या दवाखान्यांमध्ये बाळांवर उपचार केले जातात. या सगळ््यात या शिशुगृहात बाळांच्या आईचीच भूमिका येथील महिला कर्मचारी आनंदाने पार पाडत असतात. विशेष म्हणजे एवढ्या वर्षात संस्थेत आलेले एकही बाळ दगावलेले नाही..केवळ अनैतिक संबंधातूनच बाळं टाकली किंवा संस्थेत सोडली जातात हा गैरसमज आहेत. त्यामागे अनेक कारणे आहेत. आमच्या संस्थेत आलेल्या बाळांना लवकरात लवकर मायेचे छत्र मिळावे यासाठी प्रयत्न करतो आणि बाळांना दत्तक देतो. गेल्या दहा वर्षांत आमच्याकडे आलेल्या पंच्याहत्तरपैकी साठ बालकांना आम्ही मायेचे छत्र देऊ शकलो. - प्रमिला जरग(संचालिका, शिशु आधार केंद्र)बालके सोडण्याची कारणेबालके सोडण्याची कारणेअनैतिक संबंधातून जन्मकुमारीमाता मुलगी झाली म्हणूनआर्थिक अडचणी, दारिद्र्यबाळाचे अपंगत्वपालकांना असाध्य आजार सेक्सवर्करची मुलेअधिक अपत्ये सांभाळण्याची क्षमता नसणेनातेवाइकांचा आधार नाही