शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

‘आमदनी आठण्णी, खर्चा रुपय्या’

By admin | Updated: March 12, 2015 00:44 IST

कोल्हापूर मनपाची आर्थिक स्थिती : आज बजेटचे सादरीकरण; जमाखर्चाचा ताळेबंद करताना प्रशासनाच्या नाकीनऊ

संतोष पाटील - कोल्हापूर - दोनशे कोटी रुपये उत्पन्नाचा टप्पा ओलांडताना दमछाक होणाऱ्या महापालिकेचे बजेट (आर्थिक नियोजन) मात्र सातशे कोटींच्या घरात असल्याचा अनुभव गेल्या काही वर्षांपासून शहरवासीयांना येत आहे. प्रत्यक्षात पार्किंगचा उडालेला बोजवारा, जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढीग, ऐरणीवरचा टोल व पंचगंगा प्रदूषण प्रश्न, ऐतिहासिक रंकाळ्यास आलेली अवकळा, आर्थिक ओझ्याखाली दबलेली महापालिका अशा आव्हानांची मालिका प्रशासनासमोर आहे. अशा स्थितीत महापालिकेची आर्थिक घडी बसविण्यापासून नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविण्यापर्यंतचे दिव्य आयुक्त पी. शिवशंकर आज, गुरुवारी सादर होणाऱ्या बजेटमधून कसे पार पाडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.कोट्यवधी रुपये खर्चूनही रंकाळा अखेरची घटका मोजत आहे. संरक्षक भिंती ढासळू लागल्या. नैसर्गिक पुनर्भरणासह मजबुतीकरणासाठी ठोस उपायांची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पायाभूत सुविधा पुरवून पर्यटनास चालना देण्यासाठी कृती आराखडाची अंमलबजावणी कागदावरच आहे. नवीन पार्किंगस्थळे निर्माण करणे, दररोज गोळा होणारा १७५ टन कचरा टाकायचा कुठे, हे गंभीर प्रश्न आहे. कचऱ्यापासूनचा रखडलेला वीजनिर्मितीच्या प्रकल्पाचा पाठपुरावा कसा करणार याची उत्सुकता आहे. महापालिकेचे अपेक्षित उत्पन्न २५० कोटींचे असले तरी सद्य:स्थितीत २०० कोटींचा टप्पा पार करणेही मुश्कील आहे. त्यातच थेट पाईपलाईनसह अनेक योजनांसाठी कर्ज व त्याच्या परतफेडीच्या हप्त्यांची सोय करावी लागणार आहे. यापूर्वीच ‘नगरोत्थान’चे २६ कोटी, स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटचा ३७ कोटी ५० लाख कर्जाचा बोजा असलेल्या महापालिकेची आर्थिक गाडी मूळ रस्त्यावर आणण्याचे दिव्य नव्या आयुक्तांना पार पाडावे लागेल.सांगा, जगायचे कसे? महापालिकेच्या उत्पन्नाचा मेळ बसत नाही. यातच थेट पाईपलाईनसाठीचे कर्ज काढावे लागणार आहे. पंधरा वर्षांसाठी प्रतिवर्षी एक कोटी रुपयांना साडेनऊ कोटींप्रमाणे सहा कोटी ७० लाखांचा वर्षाला बोजा पडेल. यापूर्वीच कर्जाचा बोजा असलेल्या पालिकेला नव्या कर्जाचा भार कसा पेलवणार? टोलचे पैसे द्यावे लागल्यास ‘सांगा, जगायचे कसे?’ असे म्हणण्याची वेळ पालिका प्रशासनावर येण्याची परिस्थिती दर्शविते.उत्पन्नाचे स्रोत (रक्कम कोटींत)एलबीटी- ७७ मुद्रांक शुल्क- १३पाणीपुरवठा- ४०मिळकत कर- ४२इस्टेट- ८नगररचना- २५शासकीय अनुदान- ३२खर्च (रक्कम कोटींत)आस्थापना खर्च- १५० वीज व पाणी- २५विकासनिधी- १५प्राथमिक शिक्षण- १५घनकचरा व्यवस्थापन- ५खर्च - २१० कोटीअपेक्षित उत्पन्न - २५० कोटी