शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या भीतीने साखर दरात तेजी

By admin | Updated: January 17, 2017 00:35 IST

भीती अनाठायी : साखर कारखानदारीला मात्र चांगले दिवस

चंद्रकांत कित्तुरे ल्ल कोल्हापूरयंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याच्या भीतीने साखरेच्या दरात तेजी आली आहे. गेल्या गुरुवारी घाऊक बाजारात साखरेला प्रतिक्विंटल ४०२० रुपये दर मिळाला. गेल्या सात वर्षांतील हा उच्चांकी दर आहे. सध्या दर ३६०० ते ३७०० रुपये (एक्स फॅक्टरी) आहे. यामुळे साखर कारखानदारीला चांगले दिवस आले आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास कारखान्यांना कर्जाची परतफेड आणि शेतकऱ्यांची थकीत बिले भागविणे सोयीचे होणार आहे.देशातील यंदाच्या हंगामातील साखरेचे उत्पादन २३५ लाख टन होईल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात ते २१५ लाख टनांच्या आसपास राहील, असे दिसते. यामुळे यंदा साखरेची टंचाई जाणवणार अशी शंका व्यापाऱ्यांना येऊ लागल्याने त्यांनी साखर खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. परिणामी, घाऊक बाजारातील मागणी पुरवठ्यापेक्षा जादा होऊ लागल्याने साखरेचे दर वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या साखरेला ४०२० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा शिल्लक साठा ७७ लाख टन होता. चालू हंगामात उत्पादन २१५ लाख टन गृहित धरले तरी २९२ लाख टन साखर उपलब्ध होते. देशांतर्गत विक्री वर्षाला सुमारे २५० लाख टन आहे. त्यामुळे यंदा देशाला वर्षभर पुरेल इतकी साखर उपलब्ध होईलच, शिवाय पुढील साखर हंगामाच्या सुरुवातीला ४० ते ४२ लाख टन इतकी साखर शिल्लक राहील. त्यामुळे व्यापाऱ्यांची शंका अनाठायी आहे. साखरेच्या दरात आणखी फारशी वाढ होणार नाही, असे साखर कारखानदारीतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वायदे व्यवहारातील मार्जिन वाढविलेवायदे बाजारातील साखरेचे दर वाढविण्यात येत असल्याने सध्या घाऊक बाजारातील साखरेचे दर वाढत आहेत, असे लक्षात आल्याने एनसीडीएक्सने (कमोडिटी एक्स्चेंज) दरवाढीला आळा घालण्यासाठी वायदे व्यवहारातील ५० टक्के रक्कम कारखान्यांकडे लगेच जमा करण्याचा आदेश दिला आहे. आधी हे प्रमाण ४५ टक्के इतके होते. याचाच अर्थ साखर खरेदीचा वायदा केल्यानंतर निम्मी रक्कम लगेच आणि उर्वरित साखर उचलतेवेळी द्यावी लागणार आहे.महाराष्ट्राचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटणारसलग दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यातच उसाला चांगला दर मिळाल्याने उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. याचा परिणाम पुढील वर्षातील महाराष्ट्रातील साखर उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. चालू हंगामात मात्र हे उत्पादन गतवर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी म्हणजेच आठ लाख टनांवरून ते पाच लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.