शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पिण्याच्या पाण्याचे राजकारण

By admin | Updated: April 9, 2016 00:07 IST

इचलकरंजीत संतप्त प्रतिक्रिया : वारणेतून आरक्षित पाण्याचा उपसा, शेती सिंचनावर परिणाम नाही : हाळवणकर

राजाराम पाटील -- इचलकरंजी -तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि आसपासच्या खेडेगावांतील ५० हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी दानोळी (ता. शिरोळ) परिसरातील काहीजण आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चौगुले राजकीय विरोध करीत असल्याबद्दल इचलकरंजीत शुक्रवारी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, वारणा नळ पाणी योजनेसाठी इचलकरंजीसाठी आरक्षित असलेलेच पाणी दानोळी येथून उचलले जाणार आहे. त्याचा शेती सिंचन किंवा त्या परिसरातील गावांच्या पाणी कमतरतेवर कसलाही परिणाम होणार नाही, असे आमदार सुरेश हाळवणकर यांनी म्हटले आहे.शहरास पंचगंगा व कृष्णा अशा दोन नद्यांमधून पाणीपुरवठा होतो. दोन्हीही नद्यांना भरपूर पाणी असताना दररोज ५० दशलक्ष लिटर पाणी उचलून ते शुद्ध करून नागरिकांना पुरविले जाते. त्यावेळी दोन दिवसांतून एक वेळ पाणी दिले जाते. जानेवारी महिन्यात पंचगंगा नदीतील पाणी दूषित झाल्याने तेथून पाणी उपसा बंद होतो. त्यामुळे कृष्णा नदीतील पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. कृष्णा नदी दररोज ४० दशलक्ष लिटर पाणी पुरवत असली तरी दाबनलिकेवरील पाणी गळती आणि पाण्याची चोरी यामुळे प्रत्यक्ष ३५ दशलक्ष लिटर पाणीच जलशुद्धिकरण केंद्रात पोहोचते आणि मग तीन ते चार दिवसांतून एकवेळ पाणी शहरवासीयांना दिले जाते.अलीकडील चार वर्षात कृष्णा नदीवर म्हैसाळ योजना झाली आणि तीमधून प्रचंड पाणी कृष्णेतून उचलले जाऊ लागले. त्याचा परिणाम राजापूर बंधाऱ्यासाठी पाणी कमी पडण्यावर झाला. गेल्या दोन वर्षांपासून मे महिन्यात इचलकरंजीसाठी पाणी उपसा करणारे मजरेवाडी (ता.शिरोळ) येथील पंप उघडे पडू लागले. त्यामुळे इचलकरंजीस पाण्यासाठी आणखीन पर्यायी जलस्रोत शोधण्यात आले. काळम्मावाडी धरणातून थेट पाणी आणण्याच्या योजनेस येणारा प्रचंड खर्च (सुमारे ६५० कोटी रुपये) आणि त्यानंतर पालिकेला वीज बिल व देखभाल-दुरूस्ती खर्चही जमणार नाही. म्हणून ‘काळम्मावाडी’ करण्यास शासनानेच नकार दिला. त्यामुळे वारणा नदीतून पाणी आणण्याचा पर्याय समोर आला.अशा पार्श्वभूमीवर यंदा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पंचगंगा नदीतून पाणी उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतला. नदीपात्रात पूर्वीपासूनच असलेल्या बंधाऱ्याला बरगे घालून त्यातून पाणी देण्यात येऊ लागले. पिण्यासाठी पाणी उपसा होत असतानाही बंधाऱ्याचे बरगे काढा, नाही तर कृष्णा योजनेचे नळ फोडू, अशी वल्गना ‘स्वाभिमानी’चे चौगुले यांनी करून राजकीय स्टंट केल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. विरोध गैरसमजुतीतून : वस्तूस्थिती समजून घ्यादानोळी येथील वारणा नदीतून इचलकरंजीस पाणी उचलण्यास होणारा विरोध गैरसमजुतीतून आहे. वारणा धरणात इचलकरंजी शहरासाठी आवश्यक एक टीएमसी पाण्याचे आरक्षण असून, टप्प्याटप्प्याने सोडलेले पाणी दानोळी येथून उपसा होणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या आणि वारणा काठावरील अन्य गावांसाठी आवश्यक पाण्याचा अंतर्भाव नाही. अशी वस्तूस्थिती असताना दानोळी परिसरातील लोकांना कोणीतरी उठवून बसविले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केली. मात्र, आमदार उल्हास पाटील आणि प्रसंगी खासदार राजू शेट्टी यांना विनंती करून तेथील शेतकऱ्यांना वस्तुस्थिती सांगितली जाईल; पण पिण्याच्या पाण्यासाठी विरोधाचे राजकारण नको, असेही आमदार म्हणाले.