शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

ध्येयवेडे शिक्षक आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST

................. सन १९५० च्या दशकात खेडोपाडी शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असे. विशेषत: मुलींना ...

.................

सन १९५० च्या दशकात खेडोपाडी शिक्षणाच्या सोयी नव्हत्या. ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असे. विशेषत: मुलींना कोल्हापूर शहरात येऊन शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे मुलींचे शिक्षण थांबत असे. ही गैरसोय दूर व्हावी म्हणून

ज्ञानदेवे रचिला पाया ॥ तुका झालासे कळस ॥

या उक्तीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील दुर्गम अशा सांगरूळ भागात कै. स. ब. खाडे, कै. नाळे मास्तर व कै. गुरुवर्य डी. डी. आसगावकर या तीन प्रभूतींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगरुळ शिक्षण संस्थेचा पाया रचला. १९५८ साली सांगरुळ शिक्षण संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला ३४ विद्यार्थ्यांनीशी सुरू झालेल्या या संस्थेत आज जवळपास ७००० पेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.

शिक्षण क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तिमत्त्व कै. गुरुवर्य डी. डी. आसगावकर यांच्या पोटी जन्मलेल्या प्रा. जयंत आसगावकर यांना प्रथमपासूनच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची आवड होती. याचे बाळकडू सरांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले. कै. डी. डी. आसगावकर सर ८ फेब्रुवारी २००७ सालापर्यंत सांगरुळ शिक्षण संस्थेचे सेकेटरी होते. परंतु त्यांच्या आकस्मिक निधनामुळे या संस्थेची सचिव पदाची धुरा प्रा. जयंत आसगावकर सर यांच्याकडे आली. प्रथमपासूनच संस्थेतील कर्मचाऱ्यांचे हित जोपासणे, संस्थेचा शाखा विस्तार करणे, शाखांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणे, या विचाराने व ध्येयाने प्रेरित होऊन सरांनी संस्थेच्या सचिव पदाची जबाबदारी स्वीकारली व ती आज अतिशय चांगल्या पद्धतीने पेललेली आहे. सांगरुळ शिक्षण संस्थेच्या आज ११ माध्यमिक शाळा, २ ज्युनिअर कॉलेज, किमान कौशल्य विभाग, १ तांत्रिक विभाग, १ औद्योगिक प्रशिक्षण संस्था व १ वरिष्ठ महाविद्यालय असा १७ शाखांचा विस्तार झालेला आहे. सर्व शाखांना सुसज्ज इमारत बांधून पूर्ण करण्याचे स्वप्न गुरुवर्य डी. डी. आसगावकर सरांनी उराशी बाळगले होते. ते स्वप्न आमदार प्रा. जयंत आसगावकर व त्यांच्या विद्यमान संचालक मंडळ यांच्या प्रयत्नातून आज सत्यात उतरताना दिसत आहे. सर स्वत: उच्च विद्याविभूषित असून, त्यांचे शिक्षण ऑटोमोबाईल डिप्लोमापर्यंत झालेले आहे. संस्थेची जबाबदारी पेलत असतानाच सर स्वत: कुडित्रे येथील श्रीराम हायस्कूल ज्यु. कॉलेजच्या व्होकेशनल विभागाकडे गेली ३१ वर्षे अद्यापनाचे कार्य अव्याहतपणे करीत आहेत. त्यांच्या विषयाचा निकाल गेली अनेक वर्षे १०० टक्के लागत आहे.

संस्था सचिव पदाची धुरा सांभाळत अद्यापनाचे काम करत असतानाच सरांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठीही भरीव कार्य केलेले आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवणे, शासन दरबारी ते मांडणे यासाठी सर गेली २० वर्षे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करणे, शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे, वेतनेत्तर अनुदान पूर्वीप्रमाणे मिळावे, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी, महाविद्यालये व शाळांमध्ये नोकरभरती त्वरित व्हावी यासाठी सरांनी अनेकदा शासन दरबारी पाठपुरावा केला असून, आतापर्यंत कोल्हापूर, पूणे, मुंबई येथे झालेल्या सर्व शैक्षणिक आंदोलनात सरांनी भाग घेतलेला आहे.

गेल्या २० वर्षांत सर शैक्षणिक कार्य करीत असताना विविध संघटनांशी जोडले गेलेले आहेत. सध्या ते कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे सचिव, शिवाजी विद्यापीठ महाविद्यालये व परिसंस्था तपासणी समिती सदस्य, एच. एस. सी. व्होकेशनल रूपांतरण राज्य समिती सदस्य, रोटरी क्लब कोल्हापूर शहर अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांवर काम करीत आहेत. याशिवाय त्यांनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी डी. डी. आसगावकर पतसंस्थेची स्थापना केली असून, या पतसंस्थेचे सर स्थापनेपासून चेअरमन आहेत. सरांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक शाळांना ई लर्निंग सुविधा, स्मार्ट टीव्ही, बेंच प्रदान केलेले आहेत. याबरोबरच रक्तदान शिबिरांचे आयोजन, ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन, मोफत औषध वाटप, गरजूंना हिअरिंग हेड व जयपूर फुटचे वाटप, गरीब विद्यार्थिनींकरिता सायकल बँकेचा अनोखा उपक्रम यासारखे समाजोपयोगी उपक्रम गेल्या पाच वर्षांत राबविले आहेत. संस्थेच्यावतीने भागातील विद्यार्थ्यांकरिता मोफत स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू करण्यातही सरांचा मोठा वाटा आहे. आज या केंद्रात असंख्य विद्यार्थी परीक्षा पास होऊन विविध शासकीय पदांवर सेवेत कार्यरत आहेत. गुरुवर्य डी. डी. आसगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक व कोडा विकास ट्रस्टच्या माध्यमातून सरांनी जिल्हास्तरावर संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता पुरस्कार योजना सुरू केलेली आहे. सरांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध संस्थांनी सरांना सक्षम अधिकारी पुरस्कार, महाराष्ट्र गुणीजन रत्न गौरव पुरस्कार, स्टार संस्थाचालक पुरस्कार, शिक्षकरत्न पुरस्कार, आदी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे.

वरील सर्व कार्याची पोहोच पावती म्हणूनच सर आज विक्रमी मताधिक्याने निवडून येऊन शिक्षकांचे आमदार झालेले आहेत. हे सरांच्या कार्याचेच द्योतक म्हणावे लागेल. आतापर्यंत जिल्ह्यातील शिक्षकांचे नेते म्हणून ओळख असणारे सर आता शिक्षक आमदार झाल्याने पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील शिक्षकांचे नेते बनलेले आहेत. त्यामुळे सरांची पूर्वीपेक्षा अधिक जबाबदारी वाढली आहे. सर आमदार झाल्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा, सरांचे जन्मगाव सांगरुळ व परिसर, तसेच सांगरुळ शिक्षण संस्थेचा प्रत्येक कर्मचारी यांची मान अभिमानाने उंचावलेली आहे. सांगरुळ गावाला सरांच्या रूपाने प्रथमच आमदार मिळालेला आहे. सर आमदार व्हावेत म्हणून ज्या-ज्या घटकांनी परिश्रम घेतले, त्या सर्वांचे योगदान कदापि विसरणे शक्य नाही. त्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. त्याचबरोबर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो या उक्तीप्रमाणे प्रा. जयंत आसगावकर सर यांच्या या यशामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी अनुताई आसगावकर यांचाही मोलाचा वाटा आहे. उत्तरोत्तर आसगावकर सरांना अनेक मोठमोठ्या संधी मिळत राहो व सरांच्या रूपाने महाराष्ट्रातील शिक्षकांना एक आधारवड मिळो हीच अपेक्षा !

लेखन -- प्रा. डॉ. अभिजित वगणिरे

(शारीरिक शिक्षण संचालक,)

स. ब. खाडे महाविद्यालय, कोपार्डे

............

संकलन

प्रकाश पाटील - कोपार्डे

अतुल आंबी - इचलकरंजी

शिवराज लोंढे- सावरवाडी

सूरज पाटील - हेरले

बाजीराव फराकटे- शिरगाव