शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंपासाठी परतावा नसणारी ‘डी.डी.एफ.’ योजना

By admin | Updated: February 18, 2015 23:44 IST

शेतकऱ्यांवर अन्याय : घरगुती, औद्योगिक ग्राहकांना ५० टक्के परतावा देणारी योजना

दत्ता बीडकर - हातकणंगले -शेतकऱ्यांना शंभर टक्के खर्च करून वीज जोडणी घेतात. कोणताही परतावा न मिळणारी डी. डी. एफ. योजना महावितरणकडून राबविण्यात येत आहे. यामुळे घरगुती, औद्योगिक ग्राहकांना ५० टक्के परतावा देणारी योजना आहे. मात्र, शेती पंपाना वीज देताना शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.महावितरणकडे दिवसाला एक औद्योगिक ग्राहक आला, तर शेतीपंपासाठी २५ ग्राहक येतात. अशी आजची स्थिती आहे. विहिरी, ओढे आणि नदी वाहत असून ही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन नसल्याने शेतकरी गप्प आहे. महावितरणकडून घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी नॉन डी. डी. एफ. म्हणजे वीज ग्राहकांने महावितरणच्या अंदाजपत्रकाप्रमाणे स्वत: रक्कम खर्च करून वीज कनेक्शन तत्काळ घेणे. या नॉन डी. डी. एफ. योजनेतून वीज ग्राहकांना पन्नास टक्के रक्कम वीज बिलातून परतावा देण्याची सोय आहे. यामुळे पन्नास टक्के रक्कम घालून वीज ग्राहक आपली गरज ओळखून वीज कनेक्शन घेत असतो. मात्र, यामध्येही महावितरण या वीज ग्राहकांवर अन्याय करते. एक लाखापासून पाच-दहा लाखांपर्यंत वीज ग्राहक रक्कम खर्च करून वीज कनेक्शन घेत असताना महावितरण आपल्या अंदाजपत्रकातील फक्त माल मटेरिअलची रक्कम वीज ग्राहकांना परतावा करते. या कामासाठी लागणाऱ्या मंजुरीची रक्कम देताना ही वीज ग्राहकांवर अन्याय करते.घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांना नॉन डीडीएफ योजना पन्नास टक्के परताव्यासह चालू असताना ही योजना शेतिप्रधान राज्यामध्ये शेतकऱ्यांना लागू नाही. शेतीपंपाच्या विजेसाठी शेतकऱ्याने शंभर टक्के रक्कम खर्च करायची, त्याचा कोणताही परतावा मिळत नाही. यामुळे शेती वीजपंपाच्या जोडण्या ठप्प आहेत. विहिरी, नाले, नद्यांमध्ये भरपूर पाणी असूनही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे पाण्याकडे बघावे लागत आहे. महावितरणच्या अंदाजपत्रकाप्रमाणे चार-सहा पोल टाकून वीजपुरवठा करणे मुश्कील झाले आहे. रोहीच्या जोडणीमध्येही सुसूत्रता नाही. यामुळे महावितरणच्या कारभाराला शेतकरी वैतागला आहे. शंभर टक्के रक्कम भरून वीज कनेक्शन घेणे शेतकऱ्यांना शक्य नाही, अशी वस्तुस्थिती असताना महावितरणकडून शेतकऱ्यांचीच अडवणूक केली जात आहे. वीज बिलातून परतावा रक्कम मिळाल्यास आज चार दोन पोलसाठी थांबलेली हजारो वीज कनेक्शन तत्काळ मिळून शेतकऱ्यांच्या जीवनात हिरवीगार बाग फुलेल. शेतकऱ्यांचे दु:ख जाणणारे शासन आणि महावितरणचे अधिकारी या योजनेला राजी होतील का? याबाबत साशंकता वाटते. (उत्तरार्थ) शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीज जोडणीबाबत कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि संबंधित कार्यकारी अभियंता यांनी वस्तुस्थितीची माहिती शासनस्तरावर पुरविणे गरजेचे आहे.शेतीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांवर होणारे अन्याय महावितरणच्या यंत्रणेमार्फतच शासनापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे.