शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

अडले-नडलेले सावकारांच्या फासाला

By admin | Updated: March 22, 2016 01:05 IST

अनधिकृत सावकारांचा सुळसुळाट : सरकारी व्याजदर खासगी सावकारांकडून धाब्यावर; महिन्याला २० ते ३० टक्के व्याज आकारणी

राजाराम लोंढे --कोल्हापूर सरकारच्या धोरणांनुसार शेतीव्यतिरिक्त दिलेल्या तारण कर्जास १५ टक्के, तर विनातारण कर्जास प्रतिवर्षी १८ टक्के व्याज आकारणी करणे बंधनकारक आहे. परंतु, खासगी सावकारांकडून सरकारचे धोरणच धाब्यावर बसवत महिन्याला २० ते ३० टक्के दराने व्याजाची आकारणी सुरू आहे. नडलेल्या व्यक्तींच्या गळ्याभोवतीचा खासगी सावकारांचा फास दिवसेंदिवस आवळत चालला असून, बक्कळ पैसा मिळत असल्याने खेडोपाडी अनधिकृत सावकारांच्या वाढलेल्या सुळसुळाटाला लगाम लावण्याचे आव्हान पोलिसांसह निबंधक कार्यालयासमोर आहे. गेले महिन्याभरात दोन-तीन खासगी सावकारांच्या प्रकरणांनी जिल्हा हादरून गेला आहे. अमोल पवार याचे प्रकरण वेगळे असले तरी त्याचे मूळ एकच आहे. विविध कारणांनी संकटात आलेले व बँका-पतसंस्थांमध्ये पत नसलेल्या व्यक्ती सावकाराच्या जाळ्यात अडकतात. काहीजण चैनीसाठी कर्जे काढत असले तरी बहुतांशी कर्जे ही नाडलेल्या व्यक्तीच काढतात. शहराबरोबर ग्रामीण भागात खासगी सावकाराचे लोण जोरात असून त्यामध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत. शेतकरी, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीच यामध्ये अडकल्या जातात. मुळात सरकारी दर किती आहे, हेच बहुतांशी जणांना माहिती नसल्याने ‘सावकार सांगेल तो व्याजदर’ असा पायंडाच काहीसा या व्यवसायात पडला आहे. सावकारांकडून कर्ज घेताना संपूर्ण मुद्दलही कर्जदाराच्या हातात पडत नाही. कर्जाची मुद्दल देतानाच त्यातून पहिल्या महिन्याचे होणारे व्याज कापून घेतले जाते. त्यामुळे कर्जाची सुरुवातच व्याजावर व्याज आकारणीने होते.महिन्याला व्याज वसूल करण्यासाठी सावकारांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. एखाद्या महिन्यात व्याज देणे जमले नाही तर सुलतानी पद्धतीने वसुलीही केली जाते. रेकॉर्डमध्येही भूलभुलैया!सहायक निबंधक कार्यालयाकडे नोंदणीकृत सावकार वार्षिक रेकॉर्ड सरळ व्याजाच्या आकारणीचे सादर करतात. मात्र, प्रत्यक्षात चक्रवाढ व्याजाने मनमानी व्याज आकारणी करून कर्जदाराला कंगाल करण्याची प्रवृत्ती या क्षेत्रात वाढली आहे. तक्रार आली तरच कारवाईजिल्ह्यात राजरोसपणे बेकायदेशीर सावकारकी सुरू असताना शासकीय यंत्रणा मात्र सुस्त आहे. निबंधक कार्यालयाला तक्रारी आली तरच कारवाईचा प्रयत्न केला जात असल्याने सावकार मोकाट सुटले आहेत. जीवनाच्या सगळ्या दोऱ्या ज्याच्या हाती आहेत, त्या सावकाराच्या विरोधात तक्रार करण्याची कोणीही कर्जदार धाडस करणार नाही तरीही सरकारी यंत्रणा मात्र त्याच्या तक्रारीची वाट बघते. ‘एलसीबी’च्या रडारवरजिल्ह्यात सध्या गाजत असलेल्या खासगी सावकाराच्या प्रकरणाने पोलिसांसह सहकार निबंधक कार्यालयातील यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नोंदणीकृत सावकार किती, याबाबतची माहिती गोळा करण्याचे काम ‘एलसीबी’ (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा)कडून सुरू असल्याचे समजते. या दराने व्याज आकारणे बंधनकारक :४शेतकऱ्यांसाठी तारण कर्ज -९ टक्के (प्रतिवर्षी)४विनातारण कर्ज -१२ टक्के४शेतकऱ्यांशिवाय इतर व्यक्तींचेकर्ज - १५ टक्के (प्रतिवर्षी)४विनातारण कर्ज - १८ टक्केतालुकानिहाय सावकार असे :तालुकासावकार संख्यानव्याने (मार्च २०१५)मागणीकोल्हापूर शहर१४२६हातकणंगले ५५८करवीर १५४आजरा १-चंदगड ३-गडहिंग्लज८१राधानगरी१-भुदरगड १-कागल ३१शिरोळ५ -पन्हाळा ६-गगनबावडा- -शाहूवाडी--एकूण२४०२०