शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रबोधनाचा सूर्य अस्ताला..!

By admin | Updated: February 22, 2015 01:05 IST

अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी : कॉम्रेड पानसरें को लाल सलाम..; अण्णांचे अधुरे काम पूर्ण करण्याची शपथ

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या डाव्या व पुरोगामी चळवळीतील पितामह, सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी चंदनाप्रमाणे झिजणारा लढवय्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी येथील पंचगंगा मुक्तिधाममध्ये कोणताही विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या या लाडक्या नेत्याला साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण केली. मावळतीला गेलेल्या सूर्याच्या साक्षीने हा महाराष्ट्राच्याच नव्हे देशाच्या प्रबोधनाच्या चळवळीतील सूर्यही कायमचा लुप्त झाला. अंत्यसंस्कारास जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी मुठी आवळल्या. ‘कॉम्रेड गोविंद पानसरे को लाल सलाम..लाल सलाम..’ अशी आरोळी दिली. आपले लाडके अण्णा आता पुन्हा कधीच भेटणार नाहीत, या सत्याने अनेकांचा बांध फुटला. पंचगंगेला महापूर यावा तसाच अश्रूंचा लोट मने रिती करून गेला. स्मशानभूमीतून पाय काढताना प्रत्येकाच्या मनांत आपण कधीच भरून येवू शकणार नाही असे काहीतरी गमावून घरी परतत असल्याची भयाण रुखरुख सोबत राहिली. सांगा हिटलरवाद्यांनो, तुम्ही अजून मुडदे पाडणार किती...? अशी शाहिराने केलेली विचारणा अण्णांच्या दु:खाचीही उंची वाढवून गेली. पानसरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दसरा चौक मैदानावर अलोट गर्दी उसळली. अवघ्या कोल्हापूरकरांनी कडकडीत बंद ठेवून पानसरे यांना अखेरचा लाल सलाम केला. शुक्रवारी रात्री गोविंद पानसरे यांच्या निधनाची बातमी येथे पोहोचली आणि अवघे कोल्हापूर शोकसागरात बुडाले. तेव्हापासून पानसरे यांचे पार्थिव कोल्हापुरात केव्हा आणणार याची प्रतीक्षा लागून राहिली होती. दसरा चौक मैदानावर हजारोंचा जनसमुदाय हुंदके देत पार्थिवाच्या प्रतीक्षेत होता. ही प्रतीक्षा पार्थिव घेऊन आलेली रुग्णवाहिका पाहून दुपारी सव्वा वाजता संपली आणि उपस्थितांतून ‘अमर रहे, अमर रहे, गोविंद पानसरे अमर रहे’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. गेली पासष्ट वर्षे कोल्हापूरसह राज्यातील रस्त्यावर संघर्ष करणारा आपला नेता निस्तेज पडलेला पाहून जनसमुदायाला आपल्या भावनांना आवर घालणे केवळ अशक्य झाले. ‘रडायचं नाही’ असं सांगूनही कार्यकर्त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत एकमेकांच्या खांद्यावर मान ठेऊन भावनांना वाट करून दिली. (प्रतिनिधी)