शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

'हवाई सफरी'चा समारोप

By admin | Updated: January 20, 2015 23:48 IST

एरोमॉडेलिंगचे वर्कशॉप : तीन दिवसांत तीन हजारांहून अधिकांची भेट

कोल्हापूर : डॉ़ व्ही़ टी़ पाटील स्मृतिभवन येथे गेल्या दोन दिवसांपासून ‘लोकमत बाल विकास मंच’तर्फे भरविण्यात आलेल्या ‘सफर विमानांची’ या प्रदर्शनाचा आज, मंगळवारी समारोप झाला. प्रदर्शनाला तीन दिवसांत तीन हजारांहून अधिक विद्यार्थी व पालकांनी भेट दिली. ‘विमाने बनवा, विमाने उडवा’ या एरोमॉडेलिंग वर्कशॉपचे आयोजनही करण्यात आले होते. प्रदर्शनाचे प्रायोजक चाटे गु्रप आॅफ एज्युकेशन, सहप्रायोजक शाहू दूध, तर सादरकर्ते पीबीसी’स अ‍ॅरो हब हे होते. विविध प्रकारच्या ऐंशी विमानांच्या प्रतिकृती, विमानक्षेत्राचा आतापर्यंतचा इतिहास अन् क्वॉडकॉप्टरचे डेमो ही या प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये होती. विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरले, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. तसेच ‘लोकमत’ने असे विविधतापूर्ण प्रदर्शन भरविल्याबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त होत होते. तीन दिवसांत दररोज विद्यार्थी-पालकांना ‘क्वॉडकॉप्टर’चे प्रात्यक्षिक दाखविण्यात येते होते. विद्यार्थ्यांना वैमानिक म्हणून करिअर करण्याच्या दृष्टीने दिशादर्शक ठरले. सायंकाळी झालेल्या एरोमॉडेलिंग वर्कशॉपमध्ये ४० जणांनी सहभाग घेतला होता.यांचे विशेष सहकार्य लाभलेअण्णासाहेब डांगे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅँड टेक्नॉलॉजी, आष्टा येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी सलग तीन दिवस प्रदर्शनात उपस्थित राहून प्रदर्शनातील विमाने व त्यांसंबंधी सविस्तर माहिती देत होते. यामध्ये दीपक इंडे, तुषार लंबे, सचिन आहिरे, अक्षय पावले, हितेश्वर सूर्यवंशी, रणवीरसिंह आपटे, आकाश शेवळे, रामकृष्ण नेवसे, रेश्मा खाडे, श्वेता पाटील, प्रणाली कुलकर्णी, शुभम् बोरुडे, वैभव पाटील, ओमकार चौगुले, गणेश मलगुडे, तेजस माने यांचे विशेष सहकार्य लाभले. एरोनॉटिकलचे विभागप्रमुख राममूर्ती यांनी मार्गदर्शन केले.विमानाबद्दल मला खूप आकर्षण आहे. हे प्रदर्शन पाहून मला विमानाची सर्व माहिती मिळाली. येथे प्रत्येक विमानाची सविस्तर माहिती दिली जाते. वैमानिकांच्या केबिनपासून ते विमान कसे तयार होते, याची मला आज माहिती मिळाली. - ऋतुराज साथव