कोल्हापूर : शाहू जकात नाक्याजवळ झालेल्या गावठी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपीस आज, शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. संशयित अभय नितीन परीख (वय ३७, रा. शाहूपुरी) असे त्याचे नाव आहे. सांगली जकात नाका येथून खासगी वाहनाने बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केली. यापूर्वी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अविनाश बाबूराव बन व त्याची मैत्रीण ज्योती ऊर्फ प्रीती राजेंद्र पवार (१९, रा. भीमनगर, पेठ, ता. वाळवा, जि. सांगली) या दोघांना शिताफीने अटक केली होती. त्यांचा तिसरा साथीदार अभय परीख हा फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते. (प्रतिनिधी)
बॉम्बस्फोट प्रकरणातील फरारी आरोपीस अटक
By admin | Updated: September 7, 2014 00:47 IST