पेठवडगाव : वडगाव शहराच्या सर्वांगीण विकासात भर पडणाऱ्या वीज बचतीसाठी एलईडी बल्ब, वाढीव वसाहती पाणीपुरवठ्यासाठी सुधारित योजना, व्यपारी संकुल, संभाजी उद्यान, नळांना मीटर बसविणे आदी विकासकामे करावयाचे नियोजन पालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आले. कोणतीही करवाढ न करता ८० लाख ६४ हजार शिलकीचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर केले. त्यास एकमताने मंजुरी मिळाली.सभेत विषयपत्रिकेवरील आठ व आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा विद्याताई पोळ होत्या. अर्थसंकल्पाचे वाचन उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी केले.प्रश्नोत्तराच्या तासात आरोग्य यावर रंगराव पाटील, संतोष गाताडे यांनी प्रश्न विचारले. प्रशासनाच्या वतीने दोन दिवसांत काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याचे आश्वासन दिले.जलतरण तलावास विजयसिंह यादव यांचे नाव देण्यास आमची हरकत नाही. त्यास आम्ही मान्यता देत असल्याचे संतोष गाताडे यांनी सांगितले. मात्र, आमचे नेते स्व. शिवाजीराव सालपे यांचे शहर विकासात मोठे योगदान आहे. त्याची दखल पालिकेने घ्यावी. यथोचित नाव द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नगराध्यक्ष पोळ यांनी यावेळी सन्मान ठेवण्याचे आश्वासन दिले.रंगराव पाटील यांनी पुतळ्यासंबंधी प्रशासन अपुरी माहिती देत असल्याचा मुद्दा मांडला. यावर मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी पुतळ्यासंबंधी अनेक निकष आहेत. हा निर्णय शासनस्तरावर होतो. मात्र, सभेत झालेल्या अर्जावरील कार्यवाहीसाठी ठराव आवश्यक असल्याचे सांगितले.शहरात वीज बचतीसाठी एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. तसेच व्यापारी संकुलाचे काम बी. वाय. हॉस्पिटलजवळ होणार आहे. यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २ कोटी ७५ लाखांचे अनुदान अपेक्षित आहे.गावठाण वगळता वाढीव वसाहतीसाठी पिण्याची सोय होण्यासाठी सुजल निर्मल योजनेतून सात कोटी ९२ लाख रुपये मिळणार आहेत. यात दहा इंची जलवाहिनी वारणा नदी ते जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत केली जाणार आहे. यामध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी, सात किलोमीटर चार इंची, तर दोन किलोमीटर सहा इंची जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पातील जमा बाजू एक१) करापासूनचे उत्पन्न (१ कोटी २५ लाख ३० हजार), २) पालिका मालमत्ता व उपयोगिता सेवापासून उत्पन्न (८७ लाख ६१ हजार), ३) अनुदान व अंशदाने (पाच कोटी ९८ लाख ८२ हजार), ४) संकीर्ण (२० लाख ५८ हजार). महसुली संभावित उत्पन्न : ८ कोटी ३२ लाख ३१ हजार.जमा बाजू दोन : शासनाकडून विविध योजनेतून येणारी अपेक्षित अनुदाने१) वैशिष्ट्यपूर्ण कामे (२ कोटी ७५ लाख), २) नगरोत्थान अभियान/दलित्तेतर योजना (४ कोटी), ३) १३वा वित्त आयोग (१ कोटी), ४) राष्ट्रीय सरोवर संवर्धन व दलित वस्ती प्रत्येकी (५० लाख), ५) युआयडीएस एस.टी. पाणीपुरवठा (७० लाख), ६) स्मार्ट आवास घरकुल योजना (७५ लाख). अशी एकूण जमा १० कोटी ५५ लाख.जमा बाजू भाग ३ : १) असाधारण जमा (१ कोटी ६० लाख १५ हजार), १ एप्रिल आरंभीची शिल्लक : २ कोटी २२ लाख २१ हजर १२, अशी एकूण जमा २२ कोटी ६९ लाख, ६७हजार, १२७ रुपये.
८० लाखांचे शिलकी अंदाजपत्रक सादर
By admin | Updated: February 23, 2015 00:21 IST