भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 04:27 IST2024-11-13T04:27:28+5:302024-11-13T04:27:54+5:30

कल्याण पूर्व मतदारसंघातील महेश यांची बंडखोरी शमवण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांना केले आहे.

BJPs rebel candidate supports Shindesenas candidate | भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा

भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : कल्याण पश्चिम मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार वरुण पाटील यांनी महायुतीमधील शिंदेसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 

पाटील म्हणाले, “मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयात गेलो होतो. मात्र, वेळ संपली होती. त्यामुळे उमेदवारी कायम राहिली. त्यानंतर महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भोईर यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनानुसार मी भोईर यांना पाठिंबा दिला. निवडणुकीत मी भोईर यांचे काम करणार आहे.” 

यावेळी कपिल पाटील, विश्वनाथ भोईर आणि शिंदेसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील हे उपस्थित होते.

बंडखोरी शमवण्यात अखेर यश आले...
पाटील म्हणाले की, कल्याण पश्चिममधून भाजपचे उमेदवार नरेंद्र पवार आणि त्यानंतर वरुण पाटील यांची बंडखोरी शमवण्यात भाजपला यश आले.  महायुतीच्या उमेदवाराला भाजपने पाठिंबा जाहीर केला. कल्याण पूर्वतून महायुतीकडून भाजपच्या सुलभा गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. शिंदेसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी केली आहे.  कल्याण पूर्व मतदारसंघातील महेश यांची बंडखोरी शमवण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांना केले आहे.

Web Title: BJPs rebel candidate supports Shindesenas candidate