नायगाव, ता. यावल येथील सैनिक जवान रफिक हुसेेन तडवी हे देशसेवा करून गावी परतले. रफिक तडवी यांनी सैन्यदलात पंजाब कॅम्प, पटियाला कॅम्प, बुलडाना ट्रेनिंग सेंटर, अहमदनगर ट्रेनिंग सेंटर इ. ठिकाणी सेवा बजावली व सैन्यदलातून निवृत्तीनंतर नायगाव या त्यांच्या मूळगावी व किनगाव येथे त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.
किनगाव येथे माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, माजी ग्रा.पं. सदस्य संजय सयाजीराव पाटील, माजी सरपंच टिकाराम मुरलीधर चौधरी, उपसरपंच लुकमान कलंदर तडवी, किनगाव खुर्दचे सरपंच भूषण नंदन पाटील, प्रगतिशील शेतकरी सुरेश जिवराम चौधरी, समीर तडवी, राजेंद्र पाटील, मुंबई पोलीस मेहरबान तडवी इत्यादींसह मान्यवरांच्या हस्ते सैनिक जवान रफिक तडवी यांना देशसेवेबद्दल सन्मानित करण्यात आले.
०८सीडीजे ०५