शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

कृत्रिम पावलांसह सुशीलने केले आकाश ठेंगणे!

By आकाश नेवे | Updated: August 20, 2017 23:52 IST

आकाश नेवे । लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव :  अपघातात दोन्ही पावंडे गमावल्यावर हिंमत न हारता उलट जिद्दीच्या जोरावर जळगावच्या सुशील शिंपी याने कृत्रिम पावलांच्या सहाय्याने अक्षरश: आकाश ठेंगणे केले आहे. त्याने दोन्ही कृत्रिम पावंडांच्या साहाय्याने १८,३८० फूट उंचीवरील  मनाली ते खारदुंगला पास हा जगातील सर्वात उंच रस्ता सायकलीने पार करीत जणू आकाशालाच ...

ठळक मुद्देदोन्ही कृत्रिम पायांनी १८३६० फूट उंचीवर सायकलींगमनाली ते खारदुंगला पास अंतर केले पारखारदुंगला पास जगातील सर्वात उंचीवरील रस्ताकृत्रिम पायांनी एवढ्या उंचीवर एवढे अंतर पार करणारा पहिलाच सायकलिस्ट

आकाश नेवे । लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव :  अपघातात दोन्ही पावंडे गमावल्यावर हिंमत न हारता उलट जिद्दीच्या जोरावर जळगावच्या सुशील शिंपी याने कृत्रिम पावलांच्या सहाय्याने अक्षरश: आकाश ठेंगणे केले आहे. त्याने दोन्ही कृत्रिम पावंडांच्या साहाय्याने १८,३८० फूट उंचीवरील  मनाली ते खारदुंगला पास हा जगातील सर्वात उंच रस्ता सायकलीने पार करीत जणू आकाशालाच गवसणी घातली. यासोबतच त्याने ५२५ कि.मी. सायकलिंगचाही विक्रम केला आहे. ३० जुलै ते ९ आॅगस्ट या कालावधीत त्याने मनाली ते खारदुंगला पास हे अंतर सायकलीने पूर्ण केले. दोन्ही कृत्रिम पायांनी हे अंतर पार करणारा तो बहुदा पहिलाच सायकलिस्ट आहे. २०११ मध्ये सुशीलचा अपघात झाला होता. त्यात त्याने दोन्ही पाय गमावले. त्यानंतर सात महिने तो अंथरूणावरच पडून होता. नंतर त्याला कृत्रिम पायांबाबत माहिती मिळाली. अथक प्रयत्नांनी त्याला पाय मिळाले. मात्र या पायांचा उपयोग फक्त चालण्यासाठीच होईल, अशी कडक सूचनादेखील त्यासोबतच मिळाली. पण हळूहळू  पुन्हा चालायला शिकल्यानंतर त्या सूचनेतून सवलत घेत सुशिल  नंतर मोपेड, स्कूटर चालवायला लागला. त्याने बाईक चालवायला घेतली. दरम्यानच्या काळात तो विनोद रावत यांच्या संपर्कात आला. विनोद रावत यांनी एका कृत्रिम पायाने धावत अनेक मॅरेथॉन गाजवल्या, शिखरे सर केली आहेत. अनेक कठीण रस्त्यांवर बाईकदेखील चालवली आहे.  हीच बाब सुशीलसाठी प्रेरणादायी ठरली.त्यानेदेखील निर्धार केला आणि मुंबईकर विनोद रावतच्या साथीने प्रयत्नांना सुरुवात केली. २०१३ मध्ये काही लहान मॅरेथॉनमध्ये धावून विश्वास आल्यावर  मुंबई, दिल्ली, ठाणे मॅरेथॉनमध्येदेखील त्याने आपला सहभाग नोंदवला.पुण्यातील अ‍ॅडव्हेंचर बियॉँड बॅरियर या क्लबसोबत त्याने लेह ते मनाली हे अंतर पूर्ण केले.  ही रॅली अंध आणि कृत्रिम पाय वापरणाºयांसाठी आयोजित करण्यात आली होती.  ३० जुलै रोजी मनालीतून फ्लॅग आॅफ झाल्यावर हा चमू रोहतांग पासकडे निघाला. त्यानंतर दररोज चाळीस ते साठ कि.मी. अंतर चालवत १३ दिवसांत हे अंतर पूर्ण केले. जळगावमध्येदेखील सुशील कॉन्व्हॉय क्लबच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत असतो. यासाठी त्याला आमदार सुरेश भोळे, उद्योजक किरण बच्छाव, डॉ. अक्षय जोडगे  यांचे सहकार्य लाभले.

 ब्लेडची गरजसुशील आपल्याकडे असलेल्या कृत्रिम पायांनी धावत असला तरी या पायांचा उपयोग फक्त चालण्यासाठी केला जातो. धावण्यासाठी आवश्यक असलेले ब्लेड (प्रोस्थेटिक लिम्ब्ज) मिळावे म्हणून त्याचे प्रयत्न सुरू आहेत.ते ब्लेड मिळाल्यास पॅरालिम्पिकसाठी आपण नक्कीच प्रयत्न करू, असे सुशील शिंपी याने सांगितले. 

जिद्दीने बदला जगमनाली ते खारदुंगला पास पूर्ण करण्याची इच्छा होती. मात्र त्यासाठी आवश्यक ती रक्कम नसल्याने मागे हटण्याची वेळ आली होती. मात्र वेळीच मदत मिळाल्याने आपण हे लक्ष्य पूर्ण करू शकलो  त्याचा आनंद अवर्णनीय आहे. अपघात झाल्यावर पाय गेल्याने खचून न जाता जिद्दीने आपण आपली दुनिया बदलली. दिव्यांगांनी नेहमीच अशा प्रकारच्या स्पर्धात सहभागी व्हावे, आपल्यात काही कमी असे समजू नये. महत्त्वाकांक्षी राहिल्यानेच यश मिळत असल्याचे सुशील याने सांगितले.