जळगाव : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे वरिष्ठ गट क्रिकेट संघाची निवड चाचणी रविवारी (दि. १२) सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी खेळाडूंनी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी अविनाश लाठी, अरविंद देशपांडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले आहे.
ऋषिपंचमी सोहळा रद्द
जळगाव : येथील संत गजानन महाराज मंदिरात ऋषिपंचमी महानिर्वाण दिन शनिवारी आहे. मात्र शासकीय निर्बंध असल्याने ऋषिपंचमी साजरी केली जाणार नसल्याची माहिती संत गजानन महाराज मंदिर, शिरसोली रोडचे सचिव यांनी दिली आहे.
शिकाऊ उमेदवारांना अर्ज भरण्याचे आवाहन
जळगाव : शिकाऊ उमेदवारांसाठी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे ऑनलाइन अर्ज १३ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत भरावयाचे आहेत. प्रत्यक्ष परीक्षा १३ ते १६ नोव्हेंबर २०२१ दरम्यान होईल. त्यासाठी शिकाऊ उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.