शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

150 वर्षाची परंपरा असलेली रामलीला

By admin | Updated: April 24, 2017 17:08 IST

वीकेण्ड या सदरात निपाणे गावात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सादर होणा:या रामलिलेवर जगदीश बियाणी यांनी केलेले लिखाण.

 निपाणे गावात अंदाजे 150 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला गेला. तेव्हापासून भगवंताचे दशावतारी रूप या अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोंगरुपी रामलीलेतून भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी प्रकट होतात.

निपाणे गावातील रामलीला केव्हा सुरू झाली हे माहीत नाही. पण ही अलिखित परंपरा ज्याच्यावर सोपवली आहे ते कलावंत  मोठय़ा आनंदाने ती सादर करतात. अक्षय्यतृतीयेला माहेरी आलेल्या लेकी, माता भगिनी, पाहुणे मंडळे, शेजारील गावामधील  मंडळी दोन दिवस रात्रभर जागून या दशावतारी रामलीलेचा आनंद घेत असतात.
अक्षय्यतृतीयेच्या दुस:या दिवशी सूर्योदयाच्या आत रावणाला संपवून श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांना गावातून फिरतात. प्रत्येक घरासमोर माताभगिनी औक्षण कतात व भगवंताचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतात.
रामलीलेची तयारी
100 फूट लांब व 15 फूट रुंद असे मैदान ज्याला गावात रामलीला मैदान म्हटले जाते. त्या प्रांगणात कलावंतांना कला सादर करताना पायाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. मंडपात पुरेशी रोशणाई, पताकांनी सजवून (पूर्वीच्या काळी मशाली रात्रभर पेटवत ठेवून त्या उजेडात रामलीला सादर केली जात होती.) वाजंत्री, सनई, संबळ वाजविणारे चार वादक एका बाजूला तर चार वादक दुस:या बाजूला खर तर वाजंत्रीवरच या रामलीलेचं यश (सादरीकरण) अवलंबून असतं.  गणपती भगवंतांच्या आगमनाची व नृत्याची वाद्य वेगळय़ा पद्धतीचे असते. तर सरस्वती, निमदेव, सूत्रधार, श्रीकृष्ण अग्निदेव, शंकर पार्वती, श्रीराम, रावण, इंद्रजीत, कुंभकर्ण, वैदू, भीम, बकासूर, म्हैशासूर, भवानी माता पात्रानुसार वाद्याची चाल व नृत्य बदलते.
पात्र सादर करणारा कलावंत ज्या पद्धतीने ते आत्मसात करतो. संवाद फेक, जे संवाद पुराणामधून, रामायण व महाभारताच्या पुस्तकाचा आधार घेऊन तयार केलेले असतात. 
त्या पात्रांना योग्य वाटतील ते निवडक श्रवणीय व अर्थपूर्ण संवाद घेतले आहेत. श्रीराम कुंभकर्णीला रणांगणात म्हणतात, ज्यावेळी सीता स्वयंवरात पण मांडला गेला होता, त्यावेळी कुठे रे गेले होते तुमचे बळ! माङया सत्व सखी जानकीला चोरून तुम्ही व्यर्थ कुलाक्षय करून घेतला. हे तुमच्या सारख्या पराक्रमी योद्धाला शोभत नाही. आता माङया ह्या तीक्ष्ण बाणांपासून साक्षात ब्रrादेवसुद्धा तुमचे रक्षण करू शकत नाही! 
या संवादात रावण, कुंभकर्ण, मेघनाथ, शुर्पणखा यांच्या पराक्रमचे वर्णन, त्यांनी केलेली चूक (अपराध) व त्याचा गंभीर परिणाम ज्यातून या राक्षसांचे मानसिक खच्चीकरण करून ब्रrादेवसुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही तेथेच कुंभकर्ण मनाने पराभूत होतो.
तर श्रीराम रावणाला म्हणतात
क्या धुंदभरा, क्या फुंद भरा
क्या दिखते हो तुम चौरस
ऐसा लगावू तीर, उषावू तेरे दशोशीर
ज्या वेळी पृथ्वी तीन वेळा कळकळीने गजर्ना करेल, ज्या वेळी चंद्र व सूर्याचे अस्तित्व संपुष्टात येईल त्याचवेळी हा दशरथ पुत्र श्रीराम वधाला जाईल! किती अर्थपूर्ण संवाद. 
असा असतो साज
पायात पैठण, नऊवार, घुंगरू (पैंजण) अंगात कोट (राजे महाराजे परिधान करत ते) गळय़ात मोत्यांच्या माळा, डोक्यावर मुकूट (पताकांनी व मोत्यांनी सजवलेला) निमदेव मानवाला अयोग्यदायी व औषधोपचारात महत्त्वाचा वृक्ष या झाडांच्या पाल्यांनी सजवलेला परिणामी निसर्गाचे रक्षण करण्याचा संदेशच देतो तर मोरपीस मुकुटावर असलेले भगवान श्रीकृष्ण कंसाचा वध करतात व कर्ण-अजरुनाच्या युद्धात अजरुनाने विचारलेला प्रश्न ‘काका-चुलते सगे सोयरे न जाण। मी न करे गोत्र हत्या । तर श्रीकृष्ण अजरुनाला संबोधतात हे जे सर्व घडत आहे त्यांचा करता करवीता मीच आहे, ‘तू फक्त निमित्तास कारण आहे! या संवादाने अजरुनाच्या मनातील मोह छेदला जातो व मोठय़ा उत्साहाने धनुष्य खेचतो. कमरेवर मोत्यांचा व रेशमी (रंगीबेरंगी) दो:यांचा पट्टा. रामलीला सुरू होण्याच्या अगोदर चार दिशेला दिवे लावून भजनी मंडळ महादेवाची मूर्ती घेऊन गावात ईडापीडा जाऊन आरोग्य संपन्न  प्राप्त होवो, यासाठी प्रार्थना करतात. 
- जगदीश बियाणी