लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चोपडा तालुक्यातील वर्डी येथे कोसळलेल्या विमानाचा संपर्क शिरपुरहून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर, २० मिनिटांनी संपर्क तुटला होता. त्यानंतर या बेपत्ता झालेल्या विमानाचा दुसऱ्या विमानाने शोध घेऊनही सापडले नाही. मात्र, काही वेळातच `डीजीसीए`कडून बेपत्ता विमानाचा अपघात झाल्याचा संदेश आल्यानंतर, या घटनेची दुर्घटनेची माहिती मिळाली असल्याची माहिती `एसव्हीकेएम` या वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापक राहुल दंदे यांनी `लोकमत`शी बोलतांना दिली. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेली प्रशिक्षणार्थी पायलट तरूणी अंशिका गुजर हिच्या पायावर मुंबईतील नानावटी रूग्णालयात शस्त्रक्रिया झाल्याची माहितीदेखील दंदे यांनी दिली.
शिरपूर येथील स्कूल ऑफ एव्हीएशन या वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे दोन सीटर असलेले हे छोटे विमान शुक्रवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास चोपडा तालुक्यातील वर्डी येथे कोसळले. या दुर्घटनेत कॅप्टन नुरूल अमिन या तरूणाचा जागीच मृत्यू झाला असून, सह पायलट अंशिका गुजर ही गंभीर जखमी झाली. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नरूल अमिन या तरूणाचा मृतदेह रूग्णवाहिनेेके शुक्रवारी रात्रीच बंगळुर येथे पाठविण्यात आला. तर जखमी अंशिका गुजर हिला जळगावहून पहाटे तीन वाजता मुंबईतील नानावटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्या पायांना मोठी दुखापत झाल्यामुळे, तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची प्रकृती आता उत्तम असल्याचेही राहुल दंदे यांनी सांगितले. तसेच या अपघाचाचे नेमके कारण, माहिती नसल्याचेही दंदे यांनी सांगितले.
इन्फो
अकोला, शेगावकडे जातांना विमान कोसळले :
प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी वैमानिकांना प्रशिक्षणासाठी स्वत: विमान उडविण्याची परवानगी दिली जाते. त्यानुसार या दोघे प्रशिक्षणार्थी पायलटला अकोला व शेगाव या भागात विमान उड्डविण्याच्या सुचना देण्यात आली होती. त्यानुसार शिरपुरहून दुपारी पावणे तीन वाजता या विमानाने उड्डाण घेतले. प्रशिक्षण संस्थेचे स्वत:चे `एटीसी `टॉवर असल्यामुळे सुरूवातीपासून हे विमान आमच्या संपर्कात होते. मात्र, अचानक या विमानाचा संपर्क तुटला आणि काही वेळात या विमानाचा अपघात झाला.
इन्फो :
संपर्क तुटल्याने दुसऱ्याने विमानाने शोधले
`एटीसी` टॉवरमधुन या विमानाचा संपर्क तुटल्याने, प्रशिक्षण संस्थेतर्फे तात्काळ दुसरे विमान बेपत्ता विमानाच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. ज्या ठिकाणाहून या विमानाचा संपर्क तुटला होता, त्या ठिकाणी दुसऱ्या पाठविण्यात आलेल्या विमानाने शोध घेतला. विमान टू-विमानाची कनेक्टीव्हिटी होत असल्यामुळे या विमानाने सर्वत्र आकाशात शोध घेऊनही, कुठेही दिसून आले नाही. त्यानंतर या बेपत्ता विमानाची माहिती प्रशिक्षण संस्थेतर्फे डीजीसीएला देण्यात आली. त्यानंतर डीजीसीएकडून काही वेळातच हे बेपत्ता विमान कुठेतरी कोसळले असल्याची माहिती देण्यात आली.
इन्फो :
अपघातातील विमान ३०० तास हवेत उडाले होते
वर्डी येथे कोसळलेले `व्हीटी-बीआरपी` हे विमान आतापर्यंत ३०० तास हवेत उडालेले होते. या अपघातीत मृत्यू झालेला पायलट नुरूल अमिन याला ५०० तास विमान चालविण्याचा अनुभव होता तर अंशिका गुजरला ११३ तासांचा व ५८ तासांचा सोलो प्लाइंगचा अनुभव होता. एकूणच या दोघांना विमान उड्डाणाचा चांगला अनुभव असल्याचे दंदे यांनी सांगितले.