शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

पारोळ्याचा भुईकोट किल्ला गतवैभवाच्या प्रतिक्षेत

By admin | Updated: April 6, 2017 16:01 IST

भुईकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी शासनाकडून अडीच कोटीचा निधी मिळाला आहे, मात्र निधीचा वापर होवून देखील किल्ल्याची स्थिती आहे, तशीच आहे.

ऑनलाईन लोकमत/रावसाहेब भोसले
पारोळा,दि.6- ऐतिहासिक वारसा लाभलेला भुईकोट किल्ला  जीर्ण झाला आहे.  या किल्ल्याला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी शासनाकडून अडीच कोटीचा निधी मिळाला आहे, मात्र निधीचा वापर होवून देखील किल्ल्याची स्थिती आहे, तशीच आहे. इतिहासाचा हा ठेवा जपून त्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे.
शहरात मुख्य बाजारपेठेला लागून असलेला भुईकोट किल्ला म्हणजे वास्तु शास्त्राचा सुंदर नमुना आहे. किल्ल्याच्या सभोवती चौफेर तटबंदी आहे. या तटबंदीत पाण्याचा खंदक आणि पाण्याचा स्त्रोत आजदेखील आहे. एका बाजुला या खंदकात पाणी आहे. जिवंत पाण्याच्या सात विहिरी आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक महल आहे. या किल्ल्याच्या प्रवेशद्वारी सागवानी लाकडाचे प्रवेशद्वार आहे. पूर्वी सकाळी व सायंकाळी दरवाजा उघडणे अथवा बंद करण्यासाठी हत्तीचा वापर होत असल्याचे जाणकार सांगतात.
परंतु या ऐतिहासिक वास्तुची दुरवस्था झालेली आहे. या किल्ल्याच्या प्रवेशद्वारी प्रचंड दरुगधी असते. पुरातत्व विभागाने गड किल्ले सुशोभिकरण अंतर्गत भुईकोट किल्ल्याचा समावेश केला. त्या अंतर्गत अडीच कोटीचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला. या निधीतून  किल्ल्यातील साफसफाई करणे, ढासाळलेला बुरूज दुरुस्ती, तटबंदीची दुरूस्ती, अंतर्गत प्रवेशद्वाराची दुरुस्ती करणे, जॉगिंग ट्रॅक करणे आदी कामे झालीत. दीड ते पावणेदोन कोटीचा निधी खर्ची करूनही कामे झालेत की असे चित्र पाहाण्यास मिळत नाही.
 किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च होवून देखील समाधान होत नाही. आजही किल्ला आहे, त्या स्थितीत आहे. ढासाळलेले बुरुज दुरुस्ती होवून देखील परिस्थिती वेगळी नाही. ट्रॅक उखडलेला आहे, त्यावर मोठमोठे गवत आहे. या ट्रॅकचा उपयोग काही जण शौचास बसण्यासाठी करतात, अशी स्थिती आहे. पुरातत्व  विभागाच्या वतीने वास्तु संरक्षणासाठी अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे फलक लावण्यात आले होते. परंतु ते सुचना फलकच किल्ल्याच्या परिसरातून गायब झाले आहेत.
या किल्ल्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी कोटय़ावधीचा निधी खर्च केला गेला पण त्या सुरक्षतेच्या दृष्टीने आजदेखील कोणतेही प्रयत्न झालेले नाही. या किल्ल्याच्या सभोवती दुकानदारानी केलेले अतिक्रमण हे ऐतिहासिक वास्तुच्या ‘पाऊल खुणा’ पुसण्याच्या प्रयत्न  करीत आहेत. किल्ल्याच्या सभोवती चौफेर अतिक्रमण झाल्याने यात किल्ला लुप्त होत आहे. शहरातील या एकमेव ऐतिहासिक वास्तुचे जतन आणि संवर्धनासाठी कठोर पाऊले राज्य शासन आणि पुरातन विभागाकडून उचलणे आवश्यक आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा आजही दिल्ली दरवाज्याच्या नावाने ओळखला जातो. परंतु या दरवाज्याच्या कमानीसह कडा कोसळल्या आहेत. हा दरवाजादेखील अतिक्रमणाचा गर्तेत अडकला आहे. आणि किल्लाचा दिल्ली दरवाजा नामशेष झाला आहे.
289 वर्षापूर्वीचा किल्ला
सपाट मैदानावरील हा किल्ला इ.स.1727 मध्ये जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला. 525 फूट लांब व 435 फुट रूंद असलेल्या या किल्याच्या सर्व बाजुने पाण्याचे खंदक असून पूर्वेस मोठा तलाव आहे. किल्याच्या सभोवती दगड-चुन्याने बांधलेला एक व आतील बाजुस दुसरा तट आहे. पूर्वी या किल्याचे शिल्प, सौंदर्य पहाण्यासाठी परदेशी पर्यटक येत. पण किल्याची दुरवस्था पाहून परदेशी पाहुणे येणे बंद झाले.