शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

मधुकर साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी १६ संचालकांचे चेअरमनकडे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:35 IST

मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी ठोस पावले उचलावी व शेतकरी, कामगार, ऊस तोडकरी, सेवानिवृत्त कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा व रावेर-यावल तालुक्याचा मानबिंदू असलेला ‘मधुकर’ सुरू करावा.

ठळक मुद्देत्वरित हालचाली न केल्यास होणाऱ्या परिणामांना चेअरमन राहणार जबाबदारचेअरमन म्हणताण, काही संचालकांचे निवेदन चुकीचे

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी ठोस पावले उचलावी व शेतकरी, कामगार, ऊस तोडकरी, सेवानिवृत्त कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा व रावेर-यावल तालुक्याचा मानबिंदू असलेला ‘मधुकर’ सुरू करावा. तसे न केल्यास होणाºया परिणामांना आपण स्वत: जबाबदार असल्याचे निवेदन ‘मधुकर’च्या संचालकांनी चेअरमन शरद महाजन यांना दिले आहे. यामुळे कारखाना क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. ‘मधुकर’ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अडकला आह.े त्यामुळेच सन २०१९-२०चा हंगाम सुरू होऊ शकला नाही. २०१४ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी व माजी चेअरमन दिगंबर नारखेडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला विश्वासाने निवडून दिले होते. मात्र आज परिस्थिती विपरित आहे.नोव्हेंबर २०१९च्या सभेत कारखाना भाडेतत्वावर देण्यासंबंधी निर्णय झाला होता व त्याला आजी माजी संचालक, लोकप्रतिनिधी यांनी संमती दिली होती व त्यानंतर वार्षिक सभा बोलवावी, असा निर्णयही झाला होता. मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही झाली नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा घेता येणार नाही, असे चेअरमन म्हणून आपण सांगितले. मात्र लॉकडाऊनच्या आधी आपण काहीच न केल्याचाही आरोप या संचालकांनी चेअरमन यांच्यावर केला आहे. या सर्व संचालकांनी निवेदनात शेतकरी, कामगार यांनी वेळोवेळी आपले गाºहाणे आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे मांडले. त्यावर आमदार चौधरी यांनी आपणास संवाद साधून कर्तव्याची व जबाबदारी जाणीव करून दिली. त्यानंतर चेअरमन म्हणून आपण कुठलीही हालचाल न करता नकारात्मक भूमिका घेत असल्याने कारखान्यावर अवलंबून असलेल्या घटकांचे नुकसान होत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आपण संचालकांची बैठक घेऊन जुनेच मुद्दे पुढे केले. चेअरमन म्हणून आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे जाऊन प्रश्न सोडवण्याचे सौजन्यही दाखवले नाही. त्यामुळे चेअरमन म्हणून आपण गांभीर्याने लक्ष न देता वेळकाढूपणा करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर संचालक नितीन चौधरी, लीलाधर चौधरी, संजीव महाजन, मिलिंद नेहते, प्रशांत पाटील, निर्मला महाजन, अनिल महाजन, शालिनी महाजन, रमेश महाजन, शैला चौधरी, भागवत पाचपोळ, नथू तडवी, संजय पाटील, बारसू नेहते, कामगार प्रतिनिधी किरण चौधरी यांच्या स्वाक्षºया आहेत.काही संचालकांचे निवेदन चुकीचेसंचालक मंडळांच्या वेळोवेळी सर्व विषय मांडण्यात आले आहे. कारखाना हितासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही संचालकांनी दिलेले निवेदन चुकीचे आहे. आमदार शिरीष चौधरी यांना कारखाना हितासाठी मी नेहमी फोन करत असतो आणि पुढेही कारखाना सुरळीत व्हावा यासाठी आमदार चौधरी यांचे प्रयत्न असणारच आहे. कारखाना हितासाठी मी कधीही राजकारण केले नाही. भविष्यातदेखील करणार नाही. कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासंबंधी सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागते तरच पुढील विषय मार्गी लागतात. यासंदर्भात साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करून सभेची परवानगी मागितली आहे. हे सर्व विषय संचालक मंडळा समोर ठेवलेले आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात येईल.-शरद महाजन, चेअरमन, मधुकर सहकारी कारखाना, फैजपूरप्रक्रिया सुरळीत करावीकोरोनाच्या प्रादुभार्वामुळे जनरल मिटिंगच्या अडचणी येत आहेत. त्यावर याआधीच आजी-माजी संचालक, लोकप्रतिनिधी यांनी यापूर्वी संमती दिलेली आहे. त्यांचे पत्र व विद्यमान आमदार यांना भेटून विशेष बाब म्हणून भाडेतत्त्वावर कारखाना देण्यास मान्यता मिळविण्याची प्रक्रिया सुरळीत करावी व त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ घेऊन जावे.-नितीन व्यंकट, संचालक, मधुकर सहकारी साखर कारखाना.