शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

महाकाय प्रकल्पासाठी सर्वेक्षण वर्षभरात

By admin | Updated: March 2, 2015 12:59 IST

भूजल पातळी उंचावण्यासाठी राज्यभरासह देशात अभिनव ठरणार्‍या तापी आणि सातपुड्यादरम्यानच्या 'मेगा रिचार्ज' मंजूर झाल्यास मंजूर झाल्यास वर्षभरात सर्वेक्षण पूूर्ण होईल.

जळगाव : भूजल पातळी उंचावण्यासाठी राज्यभरासह देशात अभिनव ठरणार्‍या तापी आणि सातपुड्यादरम्यानच्या 'मेगा रिचार्ज' (महाकाय पुनर्भरण) प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी २१ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी गेल्या दीड वर्षापासून राज्य शासनाच्या अर्थमंत्रालयाकडे विचाराधीन आहे, हा निधी मंजूर झाल्यास वर्षभरात सर्वेक्षण पूूर्ण होईल आणि या महाकाय योजनेच्या कामाला गती येईल, असे आश्‍वासक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात, तापी ते सातपुड्यादरम्यानच्या क्षेत्रात गेल्या ४0-५0 वर्षांपासून ऊस, केळी आदी पिकांसाठी भूजलाचा प्रचंड उपसा सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी १ ते २ मीटर पाणी पातळी खोल जात आहे. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेऊन हे क्षेत्र गेल्या ५-६ वर्षांपासून 'डार्क झोन' म्हणून घोषित झालेले असून विहीर वा ट्यूबवेल करण्यावर निर्बंध आहेत. हे क्षेत्र भूवैज्ञानिकांच्या दृष्टीने 'बझारा झोन' (भरपूर पाणी जमिनीत जिरणे, झिरपणे आणि काही तासात ते विहिरींना येणे) म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे हा प्रकल्प वरदान ठरणारा आहे.त्यासाठी माजी खासदार व विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे आणि तापी पाटबंधारे महामंडळाचे माजी अधीक्षक अभियंता व्ही.डी. पाटील गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही आहेत. राज्याचे जलसंधारणमंत्री गिरीश महाजन यांचे प्रयत्न पाहता या प्रकल्पाला गती लाभेल, असे मानले जात आहे.

-------------------

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजीचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.डी.सिंग आणि त्यांचे साहाय्यक आर.पी.सिंग आणि केंद्रीय भूजल मंडळाचे संचालक पी.के.सिंग या जलतज्ज्ञांसह सुमारे १0 जणांच्या उच्चपदस्थांनी बुधवारी बर्‍हाणपूर ते चोपडा दरम्यानच्या क्षेत्राची पाहणी केली. त्यात तापी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी अभियंता पी.आर. भामरे, मुख्य अभियंता एम.एम. शिंदे आदींचाही समावेश होता. नंतर गुरुवारी या प्रकल्पासंबंधी जैन हिल्सला बैठकही झाली. खरिया घुटीला तापीवर वळण बंधारा बांधला जाईल, त्यातून तापीचे पाणी २३२ किलोमीटर लांबीच्या कॅनॉलने थेट चोपडा तालुक्याच्या पश्‍चिम टोकाला अनेर नदीपर्यंत जाईल. सातपुड्याच्या डोंगरात उगम पावणार्‍या नदी, नाल्यांमध्ये ते सोडले जाईल. याकामी भूसंपादन, पुनर्वसन जवळपास शून्य असेल, साहजिकच येत्या काही वर्षात हे पाणी भूगर्भात जिरून पाणी पातळी वाढून पूर्ववत होऊ शकेल. पाणीटंचाई इतिहासजमा होत वर्षभर पिके घेता येतील.