पुणे येथील घटनेचा कॉग्रेसतर्फे निषेध
जळगाव : पुणे येेथे १४ वर्षीय प्ररप्रांतीय बालिकेवर झालेल्या अत्याचारा प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई होण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जळगाव शहर कॉग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष शाम तायडे, प्रवीण सोनवणे, जगदीश गाढे, दीपक सोनवणे, जाकीर बागवान, शफी बागवान, निनाजी गायकवाड, सखाराम मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
टॉवर चौकात वाहतुक कोंडी
जळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी नागिरकांनी एकच गर्दी केली होती. त्यात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी कोंडी उद्भवली. यामुळे पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
तहसील समोर वाहतुक कोंडी
जळगाव : तहसील कार्यालय परिसरात पूर्वी प्रमाणे पुन्हा विविध विक्रेत्यांची दुकाने थाटल्यामुळे,दरररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यात तहसीलमध्ये कामानिमित्त येणारे नागरिकही रस्त्यावरच वाहने पार्किंग करत असल्यामुळे, या कोंडीत अधिकच भर पडत असून, काही वेळा नागरिकांना पायी चालण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने पुन्हा या ठिकाणी कारवाई मोहिम राबविण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.