शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

पांढरे सोने झळाळले ! कापसाची यंदा विक्रमी ६० लाख क्विंटलची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 13:22 IST

कापूस उत्पादनात आघाडीवर असलेले विदर्भातील दहा आणि मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

ठळक मुद्दे गेल्या हंगामात चार लाख २१ हजार क्विंटल एवढीच खरेदी तीच खरेदी यंदा सहा लाख क्विंटलवर पोहोचली. सुती धाग्याला मिळाला ऐतिहासिक भाव

- संजय देशमुख

जालना : राज्यात कापसाचे उत्पादन घेणाऱ्या १८ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत तब्बल ६० लाख क्विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी करण्यात आली आहे. परतीच्या पावसाचा फटका बसला नसता तर कापसाचे बंपर उत्पादन झाले असते, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मागील वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत केवळ १८ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. त्यातुलनेत यावर्षी अधिक खरेदी केली. यंदा ३० सप्टेंबरपर्यंत कापूस खरेदी सुरू राहणार आहे.

कापूस उत्पादनात आघाडीवर असलेले विदर्भातील दहा आणि मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. एकट्या जालना जिल्ह्याचा विचार केल्यास गेल्या हंगामात चार लाख २१ हजार क्विंटल एवढीच खरेदी झाली होती. तीच खरेदी यंदा सहा लाख क्विंटलवर पोहोचली. यंदा सीसीआयने राज्यात कापूस खरेदीसाठी ८८ खरेदी केंद्र सुरू केले होते. आजघडीला त्यांच्याकडे कापूस साठविण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक नसल्याने जास्तीत जास्त जिनिंग चालकांशी संपर्क करून त्यांच्याकडे सूत काढण्यासाठी तसेच कपाशीच्या गाठी तयार करण्यासाठी दिला जात आहे. संपूर्ण राज्याचा विचार केला असता, शंभरपेक्षा अधिक खाजगी जिनिंग आहेत. त्यात काही ठिकाणी कापसापासून धागा निर्मितीदेखील केली जाते. सध्या सीसीआयकडून कापसाला हमीभाव म्हणून पाच हजार ७०० रुपयांचा दर प्रतिक्विंटलला मिळत असल्याने आजपर्यंत सरासरी या दराने ६० लाख कापूस खरेदीची किंमत ही तीन हजार कोटी रुपयांपर्यंत जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठवाड्यातील आतापर्यंतची कापूस खरेदीगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाची मोठी खरेदी झाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात २ लाख ७२ हजार ५५५ क्विंटल (१२ लाख ४७ हजार १७८), जालना ६ लाख ६७ हजार ८७३ (४ लाख २६ हजार ७५७), परभणी ८ लाख ४३ हजार २९४ (१० लाख ६६ हजार ६६०), बीड ३ लाख ६४ हजार ९०५ (२ लाख १२ हजार ३६६), हिंगोली १ लाख ४४ हजार १८१ (५० हजार ३४२), नांदेड जिल्ह्यात २ लाख २४ हजार ७५६ (६ लाख ७० हजार ७६२) कापसाची खरेदी केली आहे. यात कंसातील आकडेवारी ही मागील वर्षीच्या खरेदीचे आहेत.

सुती धाग्याला मिळाला ऐतिहासिक भावकापसापासून धागानिर्मिती उद्योगाला यंदा कोरोनानंतर चांगले दिवस आले ओहत. कधी नव्हे, तो सुती धगा ३०० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे. यंदा जिनिंग उद्योगाने कात टाकली असून, सीसीआयकडून सूतनिर्मिती आणि गठाण तयार करण्यासाठी कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने हा उद्योग यंदा तेजीत आहे.- संजय राठी, संचालक काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेक्सप्रोसिल

टॅग्स :Jalanaजालनाcottonकापूसagricultureशेती