ही जलवाहिनी फुटल्याचे कळताच जालना पालिकेतील पाणीपुरवठा सभापती पूनम स्वामी तसेच पालिकेतील अन्य अधिकाऱ्यांनी अंबड येथे धाव घेऊन जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते. असे असतानाच या जलवाहिनीला दोन ठिकाणी मोठे तडे गेले आहेत. या तड्यांना जोडण्यासाठी वेल्डिंग करून ते दुरुस्त केले जात आहेत; परंतु यासाठी पैठण येथील पंप हाऊसमधील संपूर्ण पाणीपुरवठा थांबवावा लागला आहे. आता ही जलवाहिनी दुरुस्त होऊन त्यातून पाणी सुरू करण्यासाठी किमान दोन दिवस लागणार आहेत. एकूणच जालना शहरातील अनेक भागांत आठ दिवसांतून एक वेळेस पाणीपुरवठा होत आहे. तो पाणीपुरवठा आता आणखी दोन दिवस उशिराने होणार आहे.
चौकट
नागरिकांनी सहाकर्य करावे
अंबड येथे सलग तिसऱ्यांदा जलवाहिनी फुटली आहे. यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. असे असतानाच दुरुस्तीसाठी मुख्य पंप हाऊसमधून पाणीपुरवठा थांबवावा लागतो. या कारणामुळे दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती पूनम स्वामी यांनी केले आहे.