२२ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमा असून, या सणानिमित्त रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. सध्या बहुतांश गाड्यांना आरक्षणाचे वेटिंग असल्याचे सांगण्यात आले आहे.
दक्षिण - मध्य रेल्वे विभागातील जालना जंक्शन येथून राज्यातील पुणे, मुंबई, मनमाड, नाशिक, औरंगाबाद यांसह आंध्र, तेलंगणा व दक्षिण, उत्तर भारतात जाण्यासाठी २० ते २२ रेल्वे सुरू आहेत. पूर्वीपेक्षा ही संख्या कमी आहे. यातच पॅसेंजर रेल्वे सुरू नसल्याने विशेष एक्स्प्रेस रेल्वेवर प्रवाशांचा ताण वाढला आहे. ऐनवेळी आरक्षण करण्यासाठी आलेल्या अनेक प्रवाशांना विविध रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
जालना येथून राज्यातील विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. यात औरंगाबाद, मुंबई, पुणेकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
४० टक्के प्रवासी संख्या वाढली
n कोरोना काळात २० ते ३५ टक्के प्रवासी प्रवास करायचे: परंतु, सध्या ४० टक्क्यांनी प्रवासी संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे.
n डेमू या पॅसेंजर रेल्वेसह इतर एक्स्प्रेस गाड्यांनाही प्रवासी संख्या वाढलेली दिसून येत आहे.
n अनलॉकनंतर प्रवासी रेल्वेची संख्या वाढली नसली तरी ३५ ते ४० टक्के प्रवासी संख्या वाढली आहे. याचा फायदा रेल्वे प्रशासनाला होत आहे.