शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
3
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
4
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
5
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
6
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
7
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
8
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
9
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
10
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
11
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
12
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
13
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
14
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
15
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
16
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
17
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
18
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
19
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
20
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस

पावणे सहा लाख क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

जालना : जिल्ह्यात सीसीआयच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आठ केंद्रांवर आजवर तब्बल पावणे सहा लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात ...

जालना : जिल्ह्यात सीसीआयच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आठ केंद्रांवर आजवर तब्बल पावणे सहा लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांनी हा कापूस विकला आहे.

गतवर्षी कोरोनामुळे सीसीआयमार्फत सुरू करण्यात आलेले कापूस खरेदी केंद्र बंद पडले होते. परराज्यातील अनेक मजूर गावी निघून गेल्याने कापूस खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यास मोठा विलंब झाला होता. यंदा मात्र, सीसीआयच्या वतीने जिल्ह्यात वेळेवर कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठ ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रांवर शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जात आहे. यामध्ये जालना येथील केंद्रावर ४००५ शेतकऱ्यांचा एक लाख २ हजार ४३८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. बदनापूर येथील केंद्रावर १६५७ शेतकऱ्यांचा ५४ हजार ३३५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. परतूर येथील केंद्रावर ३७०५ शेतकऱ्यांचा ९४ हजार ४५९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. मंठा येथील केंद्रावर २१६५ शेतकऱ्यांचा ५२ हजार ७३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. भोकरदन येथील केंद्रावर २५४० शेतकऱ्यांचा ८६ हजार ६६३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. राजूर येथील केंद्रावर ११५५ शेतकऱ्यांचा ३९ हजार ३३६ क्विंटल, कुंभार पिंपळगाव येथील केंद्रावर २३४५ शेतकऱ्यांचा ६२ हजार ७६ क्विंटल तर शहागड येथील केंद्रावर ३४८० शेतकऱ्यांचा ८४ हजार ६८७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

खाजगी व्यापाऱ्यांकडे २२ हजार क्विंटल

जिल्ह्यातील खाजगी व्यापाऱ्यांनी २२ हजार ५९ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. यात परतूरमध्ये ३८०० क्विंटल, मंठ्यात ८ हजार ५५० क्विंटल, भोकरदनमध्ये ४ हजार ५०९ क्विंटल, कुंभार पिंपळगाव येथे ३१०० क्विंटल, तर शहागड येथील व्यापाऱ्यांनी २१०० क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.

केंद्रावर वाहनांच्या रांगा

सध्या सर्वच सीसीआय कापूस खरेदी केंद्राच्या बाहेर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कापूस खरेदीस विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना दोन- तीन दिवस केंद्रावरच थांबावे लागत आहे. त्यामुळे कापूस खरेदीची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.