जालना : सेवा कार्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर शतकोत्तर गौरवशाली परंपरा असलेल्या लायन्स क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी समाजाच्या गरजा ओळखून सेवा कार्यासाठी स्फूर्ती देणाऱ्या चहाप्रमाणे सदैव कडक आणि तरतरीत राहावे, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे प्रथम उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ जालना मर्चंट सिटीचा २३व्या वर्षातील पदग्रहण सोहळा बुधवारी उत्साही वातावरणात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स जालना मर्चंट सिटीचे अध्यक्ष विनोद पवार हे होते. यावेळी रिजन चेअरपर्सन अतुल लढ्ढा, माजी प्रांतपाल विजयकुमार बगडिया, झोन चेअरपर्सन दत्तात्रय नंद, पारसमल देसरडा, डॉ. धीरज छाबडा, सतीश संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रिजन चेअरपर्सन अतुल लढ्ढा यांनी नवीन सदस्यांना शपथ देत लायन्सच्या नियम व कार्याविषयी माहिती दिली. यावेळी माजी प्रांतपाल विजयकुमार बगडिया, डॉ. दत्तात्रय नंद यांनी मार्गदर्शन केले. नवीन सदस्य दत्ता बावणे, सुरेश चिकने, प्रमोद गंडाळ, सुनील देशमुख, विनोद वीर यांना शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन सतीश संचेती व सचिव राजेश फदाट यांनी केले. कोषाध्यक्ष इंद्रराज केदारे यांनी आभार मानले.
यावेळी अभय साहनी, रवींद्र राऊत, मनोहर खालापुरे, विजय दाड, श्याम लोया, अरुण मित्तल, सुनील बियाणी, संतोष दुधानी, विनीत साहनी, बंकट खंडेलवाल, मोहन इंगळे, मोहन गुप्ता, राधेश्याम टिबडेवाल, राजेश लुणिया, सुशील पांडे, पवन झुंगे, सतीश जाधव, खंडेश जाधव, सागर देवकर, हरीश उने, सुनील भगत, धर्मेंद्र कुमावत, डॉ. आनंद अग्रवाल, डॉ. मनीष अग्रवाल, अंकुश राऊत, पवन देशमुख, ललीत जैन, डुंगरसिंग राजपुरोहित, किशोर तिवारी, डॉ. धन्नावत, डॉ. रवींद्र नाईक, सतीश बगडिया, पियुष शाह, राजेंद्र पोरवाल, ध्रुवकुमार अग्रवाल आदींची उपस्थिती होती.
फोटो