जालना : पीओपीच्या (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) मूर्ती विसर्जनानंतर विरघळत नाहीत. यासाठी आता त्यात खाण्याचा सोडा हा पर्याय उपलब्ध झाला आहे. घरगुती मूर्ती विसर्जित करण्यासाठी पाणी आणि त्यात खाण्याचा सोडा प्रमाणात टाकल्यानंतर ४८ तासापर्यंत या मूर्ती विरघळणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
पीओपीच्या मूर्ती वेळेत विरघळत नाहीत. यामुळे शाडू मातीच्या मूर्ती वापराव्यात, यासाठी आग्रह धरला जातो, पर्यावरणप्रेमींसह संस्थांकडून याबाबत जनजागृतीही केली जाते. पीओपीच्या मूर्तींमुळे पर्यावरणावरही परिणाम होतो. परंतु, या पीओपीच्या मूर्ती आता खाण्याचा सोडा किंवा अमोनियम बायकार्बोनेटचा वापर केला, तर लवकर विरघळणे शक्य होणार आहे. घरगुती मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर त्यात प्रमाणात वरील द्रव टाकले, तर मूर्ती लवकर विरघळण्यास मदत होणार आहे.
४८ तासात विरघळते मूर्ती
विसर्जनानंतर पीओपीच्या मूर्ती विरघळण्यास विलंब लागतो. त्यामुळे पर्यावरणावरही परिणाम होतो. परंतु, या मूर्तींमध्ये प्रमाणात खाण्याचा सोडा टाकल्यानंतर ती मूर्ती साधारणत: ४८ तासात विरघळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. याउलट शाडू मातीच्या मूर्ती विसर्जनानंतर लवकर विरघळत असल्याचे दिसून येते.
शाडूच्या मूर्ती गरजेच्या
गणेशोत्सव साजरा करताना शाडू मातीच्या मूर्तींनाच प्राधान्य द्यावे. पीओपीच्या मूर्ती पर्यावरणासाठी घातक असतात. पीओपीच्या मूर्ती वेळेत विरघळत नाहीत. त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकून विरघळविणे खर्चिक आहे. असे असले तरी, त्या मूर्ती वेळेत विरघळण्यासाठी हा प्रयोग व्हावा.
- रमेश काळे
नंतर खत म्हणून करा पाण्याचा वापर
खाण्याचा सोडा टाकून मूर्तींचे विसर्जन करीत त्या विरघळविल्या, तर त्यातील राहणारे पाणी फूलझाडांसाठी वापरता येते.
पीओपीत काथ्याचा वापर केला जातो. त्यामुळे मूर्ती वितरित केल्यानंतर हा काथ्या झाडांना टाकल्यास त्याचे खत होऊन तो झाडांना पोषक ठरतो.
असे असावे खाण्याच्या
सोड्याचे प्रमाण...
मूर्तीची पाण्याचे खाण्याचा
उंची प्रमाण सोडा (लिटरमध्ये) (किलो)
७ ते १० इंच १५ २
११ ते १४ इंच २० ते २२ ४
१५ ते १८ इंच ५० ६