जालना : मागील सत्तावीस वर्षापासून सुरू असलेल्या ख्रिसमस ट्रॉफीचे यंदा डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूलच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. युवासेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांच्या हस्ते शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ख्रिस्त जन्मोत्सव निमित्त ख्रिसमस ट्रॉफी २०२० टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन स्व. आनंद भाऊ कांबळे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या प्रसंगी आर.आर. सोजवळ, युवासेनेचे राज्यविस्तारक अभिमन्यू खोतकर, स्टील असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम गोयल, राजुरी स्टीलचे संचालक कैलास लोया, मराठवाडा धर्मप्रांतचे सचिव विवेक निर्मळ, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, रविकांत दानम, अब्राहाम घुमारे, ब्रिजेश नायर, मोजेस श्रीसुंदर, प्रशांत कसबे, आयोजक शिवसेना दलित आघाडीचे शहरप्रमुख भोला कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अभिमन्यू खोतकर म्हणाले की, दरवर्षी होणाºया या स्पर्धेची आम्हीदेखील वाट पाहत असतो. या स्पर्धेतून एक चांगला खेळाडू निर्माण व्हावा हीच अपेक्षा आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी अनमोल कांबळे, आशिष पाटोळे, प्रतीक गायकवाड, सौरभ नाटेकर, काका ससाणे, काका ढगे, संजय जाधव, विजय वाघमारे, सचिन जगधने, संजय प्रसाद, मनोज कांबळे, जॉन हातागळे, रवी जाधव, नितीन कांबळे, करण कांबळे, गणेश खरात, दीपक गायकवाड, राज भालेराव, विजय आव्हाड, अमित अडबोले, किरण ससाणे, आदित्य कांबळे, मनोज आहिरे, जॉन लोखंडे, निखिल लोखंडे आदी प्रयत्न करीत आहे.