पारध : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी आयोजित शिबिरात कुटुंब नियोजनाच्या १९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
आरोग्य केंद्राच्या परिसरातील लिंगेवाडी, चोऱ्हाळा, पिंपळगाव रेणुकाई, रेलगाव, वरुड बु., विरेगाव, पारध, बाभूळगाव, शिपोरा आदी गावांतील १९ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्जन हिना, वैद्यकीय अधिकारी सिद्दिकी, वैद्यकीय अधिकारी सतीश बावस्कर, के. एम. शिंदे, डी. एस. इंगळे, जी. एम. देशपांडे, एम. ए. रायलकर, ए. एम. ठोंबरे, एस. बी. किरनाके, एम. डी. खेसर, आर. आर. फदाट, एस. एन. पांढरे, आर. टी. राकडे, ए. ए. बोर्डे, एन. पी. पोटे, निर्मला बावस्कर, एस. बी. सपकाळ, ए. एम. शिहरे, शेख जुबेर आदींनी परिश्रम घेतले.