शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

ट्रेंडिंगमधले गेम्स

By admin | Updated: July 31, 2016 03:49 IST

इंटरनेटवरती ट्रेंडिंगमध्ये अनेक प्रकारचे विषय हे सातत्याने वर-खाली जागा मिळवितच असतात.

इंटरनेटवरती ट्रेंडिंगमध्ये अनेक प्रकारचे विषय हे सातत्याने वर-खाली जागा मिळवितच असतात. मग नवीन येणारा चित्रपट असो, एखादे पुस्तक असो, एखाद्या देशात घडलेली घटना, एखाद्या नेत्याचे वक्तव्य, नैसर्गिक आपत्ती असे विविध विषय येथे चर्चेत असतात. ह्या वेळी मात्र ह्या ट्रेंडिंगमध्ये मानाचे स्थान चक्क दोन गेम्सनी पटकावले आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जगभरातच सर्वांत जास्ती या गेम्सविषयी लिहिले गेले, सर्च केले गेले आणि आपोआपच ह्या गेम्स ट्रेंडमध्ये वरच्या स्थानी पोहोचल्या. नक्की असे घडले तरी काय, हे जाणून घेऊ या...पोकेमॉन गो - जगातील काही प्रमुख देशांत नुकत्याच लाँच झालेल्या या मोबाइल गेमने सर्वांनाच संपूर्णपणे झपाटून टाकले आहे. पोकेमॉन हे तसे मागच्या पिढीचे जुने कार्टून कॅरेक्टर, पण ते गेमच्या रूपात अवतरले आणि एकच धमाल जगभर उडाली. ह्या गेमचे वैशिष्ट्य म्हणजे, मोबाइलचे जीपीएस आणि कॅमेरा दोन्ही चालू ठेवून तुम्हाला हा गेम खेळावा लागतो. तुमच्या जीओ लोकेशननुसार आणि प्रमाण वेळेनुसार विविध जाती-प्रजातींचे पोकेमॉन शहरातल्या विविध भागांत तुमच्या समोर येत जातात आणि तुम्ही त्यांना पकडायचे असते. ह्या पोकेमॉन्सना पकडण्याच्या नादात अनेक तरुण-तरुणी सध्या शहरभर हिंडताना दिसत आहेत. काहीतर इतरांच्या खाजगी मालमत्तेतदेखील शिरत आहेत. या गेमच्या नादात एका खेळाडूचा मृत्यू झाला असून, काही यूजर्सना पोकेमॉन्स मिळवून द्यायचे आमिष दाखवून, विशिष्ट ठिकाणी बोलावून लुबाडल्याचेदेखील समोर आले आहे. ह्यामुळे त्या-त्या देशांतील पोलिसांची डोकेदुखी मात्र प्रचंड वाढली आहे. ह्या गेमसाठीचा यूजर्सचा उत्साह मात्र कमी होण्याची लक्षणे नाहीत. इंटरनेटवरती विविध विक्रम प्रस्थापित करीत असतानाच, ह्या पोकेमॉन गो गेमने चक्क गूगलच्या सर्च ट्रेंडिंगमध्येदेखील अव्वल नंबर पटकावत कमालच केली आहे. जगभरात आजपर्यंत गूगल सर्चमध्ये सगळ्यात जास्ती शोधला जाणारा विषय म्हणून ‘पॉर्न’चे हक्काचे स्थान होते. मात्र आता चक्क पॉर्नपेक्षाही जास्ती शोध ह्या गेमचा आणि त्या संबंधातील इतर साहित्याचा घेतला गेल्याचे गूगलनेच प्रसिद्ध केले आहे. भारतातही अलीकडेच हा गेम दाखल झाला असून, सगळीकडे एकच गोंधळाला सुरुवात झाली आहे.ओव्हरवॉच - मे महिन्यात लाँच झालेली फर्स्ट पर्सन शूटर ‘ओव्हरवॉच’ हा गेम आता तिच्यावरती अमेरिकास्थित हिंदू नेत्याने आक्षेप घेतल्याने जोरदार चर्चेत आली आहे. ‘ओव्हरवॉच’ हा सध्या जगभरात सर्वांत जास्ती लोकप्रिय असलेल्या गेम्सपैकी एक आहे. या गेममधील ‘सिमेट्रा’ हे कॅरेक्टर हिंदू देवता कालीशी साधर्म्य दाखविणारे आहे आणि ते चूक आहे असा आक्षेप हिंदू नेते राजन जेड यांनी घेतला आहे. राजन हे अमेरिकेतील नेवाडा राज्याचे रहिवासी आहेत. अमेरिकेतील युनिव्हर्सल सोसायटी आॅफ हिंदूइझमचे ते अध्यक्ष आहेत. यापूर्वीदेखील त्यांनी काही गेम्सच्या कॅरेक्टरवरती याच कारणाने आक्षेप घेतलेले आहेत. हे सिमेट्रा कॅरेक्टर गेममधून हटविण्याची मागणी करतानाच ते पुढे म्हणाले की, हिंदू हे देवाची भक्ती आणि आराधना करतात. संगणकावरती माऊस, कीबोर्ड आणि जॉयस्टीक वापरत या देवांनाच कंट्रोल करणे पूर्णत: अपमानास्पद आणि अयोग्य आहे. ‘देवी ही देवळात दर्शन घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी आहे. एखाद्या गेममधील आभासी युद्धभूमीवरती लढणारे एक कॅरेक्टर म्हणून तिचा वापर करणे हे अत्यंत चुकीचे आहे. हिंदू पुराणे, विविध देवांचे अवतार, चिन्हे ह्यांचा अशा प्रकारे वापर करणे अत्यंत चुकीचे आहे. तो समाजात ह्या विषयावरती गैरसमजच जास्ती पसरवतो. ह्या गेमला सर्व थरातूनच विरोध व्हायला हवा,’ अशी मागणीदेखील जेड यांनी केली आहे. ओव्हरवॉचच्या निर्मात्यांकडून मात्र अजूनही ह्या विषयावरती काहीही अधिकृत मत व्यक्त करण्यात आलेले नाही.