शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वायू प्रदूषणामुळे भारतीयांचा अकाली मृत्यू

By admin | Updated: February 22, 2015 00:03 IST

वायू प्रदूषणामुळे भारतीय जनजीवनावर होणाऱ्या भयावह दुष्परिणामावर शिकागो, हार्वर्ड आणि येल विद्यापीठाने प्रकाश टाकत वेळीच उपाययोजना न केल्यास अनेकांना अकाली मृत्यूला कवटाळावे लागेल,

शिकागो : वायू प्रदूषणामुळे भारतीय जनजीवनावर होणाऱ्या भयावह दुष्परिणामावर शिकागो, हार्वर्ड आणि येल विद्यापीठाने प्रकाश टाकत वेळीच उपाययोजना न केल्यास अनेकांना अकाली मृत्यूला कवटाळावे लागेल, असा गंभीर इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर भारताला सर्वाधिक वायू प्रदूषण असलेल्या देशांच्या यादीत टाकले आहे. या विद्यापीठांनी सखोल अभ्यासाअंती काढलेल्या निष्कर्षानुसार वायू प्रदूषणामुळे भारतीय लोक तीन वर्षे आधीच मरण पावतात.‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली’च्या ताज्या अंकात अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध झाला आहे. सुरक्षित मापदंडापेक्षाही अधिक प्रमाणात सूक्ष्म कण पदार्थांचे प्रदूषण असलेल्या भागात भारतातील ६६ कोटी लोकसंख्या राहते. मापदंडाचे पालन करून वायू प्रदूषण भारताने आटोक्यात राखल्यास भारतीयांचे आयुष्य आणखी तीन वर्षांनी वाढू शकते. एवढेच नाही तर २.१ अब्ज जीवन वर्षे वाचतील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.ही मोठी किंमत...वायू प्रदूषणामुळे दोन अब्जाहून अधिक जीवन वर्षांचे नुकसान होणे म्हणजे वायू प्रदूषणामुळे मोजावी लागणारी मोठी किंमत आहे, असे मत हार्वर्ड केनेडी स्कूलच्या अ‍ॅव्हिडेन्स फॉर पॉलिसी डिझाईनच्या संचालक रोहिणी पांडे यांनी म्हटले आहे. भारत किफायतशीर मार्गाने ही स्थिती बदलू शकतो. या अहवालात येल विद्यापीठाचे निकोलस रेयान, हार्वर्डच्या जान्हवी नीलकेणी, अनिश सुगाथन आणि शिकागो विद्यापीठाचे अनंत सुदर्शन यांचे लेख आहेत. भारत सरकारने वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले टाकली आहेत. तथापि, आणखी उपाय करणे जरूरी आहे.(वृत्तसंस्था)४भारताने आर्थिक वृद्धीवर अधिक लक्ष द्यायला हवे; परंतु वृद्धीच्या पारंपरिक व्याख्येमुळे वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांकडे दुर्लक्ष झाले. वायू प्रदूषण भारतीयांच्या अकाली मृत्यूचे कारण बनले असून आर्थिक वृद्धीही धीमी होत आहे. ४वायू प्रदूषणामुळे उत्पादन घटते, आजारपण वाढते. परिणामी आरोग्यावरील खर्चाचा बोजाही वाढत जातो, असे युनिव्हर्सिटी आॅफ शिकागोतील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटचे संचालक मायकल ग्रीनस्टोन यांनी म्हटले आहे.४जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरातील सर्वाधिक वायू प्रदूषण असलेल्या २० शहरांपैकी भारतातील १३ शहरे असून यापैकी दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. श्वसनाशी संबंधित आजारामुळे भारतात होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.